Animal Collection : बॉक्स ऑफिसवर ‘ॲनिमल’ची गर्जना; रणबीरच्या करिअरमधील सर्वांत मोठी ओपनिंग

‘ॲनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. रणबीरने चित्रपटात अर्जुन नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली आहे. जो अत्यंत निर्दयी आणि तितकाच महत्त्वाकांक्षी आहे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. या चित्रपटाच्या कथेत वडील आणि मुलाच्या नात्याला विशेष अधोरेखित केलं आहे.

Animal Collection : बॉक्स ऑफिसवर 'ॲनिमल'ची गर्जना; रणबीरच्या करिअरमधील सर्वांत मोठी ओपनिंग
Animal movieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 10:51 AM

मुंबई : 2 डिसेंबर 2023 | रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पण संदीपच्या याआधीच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाप्रमाणेच ‘ॲनिमल’नेही प्रेक्षकांच्या विशेष वर्गाला थिएटरकडे आकर्षित केलं आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच देशभरात 61 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात 110 ते 115 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दिल्ली एनसीआर परिसरात ‘ॲनिमल’चे 1318 शोज होते. तर मुंबईत त्याचे 1040 शोज होते. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे. हैदराबादमध्ये तेलुगू भाषेतील 316 शोज तर चेन्नईमध्ये तमिळ भाषेतील 88 शोज होते. यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर या यादीत दुसऱ्या स्थानी शाहरुखचाच ‘पठाण’ हा चित्रपट होता. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 57 कोटी रुपये कमावले होते. आता रणबीरच्या ‘ॲनिमल’ने शाहरुखच्या ‘पठाण’चा विक्रम मोडला आहे. या यादीत चौथ्या स्थानी सलमान खानचा ‘टायगर 3’ हा चित्रपट असून त्याने पहिल्या दिवशी 44.50 कोटी रुपये कमावले होते.

हे सुद्धा वाचा

रणबीरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटासोबतच विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा चित्रपटसुद्धा थिएटरमध्ये 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 5.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘ॲनिमल’ने ‘सॅम बहादूर’ला तगडी टक्कर दिली असली तरी प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहता विकी कौशलच्या चित्रपटाला भविष्यात आणखी चांगला फायदा होऊ शकतो, असा अंदाज काही चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने याआधी शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 278 कोटी रुपयांची कमाई केली होती. रणबीर कपूरविषयी बोलायचं झाल्यास, ‘ॲनिमल’ हा त्याच्या करिअरमधील सर्वांत मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी त्याच्या ‘संजू’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 34.75 कोटी रुपये कमावले होते.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.