संसदेत पोहोचला ‘ॲनिमल’चा वाद; खासदार म्हणाल्या “माझी मुलगी रडत थिएटरमधून बाहेर आली अन्..”

'ॲनिमल' या चित्रपटातील सीन्स, डायलॉग्स यांवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. याआधी गीतकार स्वानंद किरकिरे यांनी चित्रपटावर टीका केली होती. आता चित्रपटाचा हा विषय संसदेपर्यंत पोहोचला आहे. खासदार रंजीत रंजन यांनी म्हटलंय की त्यांची मुलगी चित्रपट पाहताना मध्यातूनच रडत थिएटरमधून बाहेर पडली.

संसदेत पोहोचला 'ॲनिमल'चा वाद; खासदार म्हणाल्या माझी मुलगी रडत थिएटरमधून बाहेर आली अन्..
Animal
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 12:58 PM

मुंबई : 8 डिसेंबर 2023 | संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाला एकीकडे बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडे या चित्रपटातील सीन्स, डायलॉग्सवरून टीकासुद्धा होत आहे. हा चित्रपट स्त्रीविरोधी असल्याची टीका सोशल मीडियावर अनेकांनी केली. आता ‘ॲनिमल’चा वाद थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. छत्तीसगडच्या काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी रणबीर कपूरच्या या चित्रपटातील कंटेटवरून जोरदार निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट पाहिल्यानंतर माझी मुलगी थिएटरमधून रडत बाहेर आली, असं त्यांनी म्हटलंय.

रंजीत रंजन म्हणाल्या, “चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आम्ही लहानपणापासून चित्रपट पाहत आलोय. अशा चित्रपटांचा तरुणाईवर खूप मोठा परिणाम दिसून येतो. ‘कबीर सिंग’, ‘पुष्पा’ आणि आता ‘ॲनिमल’सारख्या चित्रपटांमधून तरुणाईला काय शिकायला मिळेल? माझ्या मुलीचे कॉलेजमध्ये बऱ्याच मैत्रिणी आहेत, ज्या महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहेत. चित्रपट पाहताना तिला रडू कोसळलं आणि मध्यातच ती रडत उठून निघाली.”

“चित्रपटात इतकी हिंसा दाखवली आहे, महिलांचा विनयभंग केला जातोय. अशा गोष्टी चित्रपटात दाखवणं मला आवडत नाही. ‘कबीर सिंग’कडे पाहा, तो ज्या पद्धतीने त्याच्या पत्नीशी, लोकांशी, समाजाशी वागतो ते योग्यच असल्याचं चित्रपटात दाखवलंय. हा विषय विचार करायला भाग पाडणार आहे. अशा चित्रपटांचा, अशा हिंसेचा आणि अशा नकारात्मक भूमिकांचा आपल्या अकरावी-बारावीतल्या मुलांवर परिणाम करू लागला आहे. अशा भूमिकांना ते आदर्श समजू लागले आहेत. अशा गोष्टी आपण चित्रपटांमध्ये पाहतोय, म्हणूनच समाजातही आपल्याला अशा पद्धतीची हिंसा दिसून येतेय”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

रंजीत रंजन यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटातील एका गाण्यावरही आक्षेप घेतला आहे. “या चित्रपटात ‘फाड के गंदासी मारी..’ असं पंजाबी गाणं आहे, जे गँगवॉरच्या वेळी ऐकायला मिळतं. दोन कुटुंबीयांमधील द्वेषाच्या लढाईत हे गाणं वाजवलं गेलंय. कॉलेजमध्ये तो ज्याप्रकारे मोठी हत्यारे घेऊन हिरोला मारतो, ते खूप चुकीचं आहे. असं केल्याने त्याला कोणीच शिक्षासुद्धा देत नाही. या चित्रपटात जे जे दाखवलंय, ते सर्व चुकीचं आहे”, असं त्या पुढे म्हणाल्या.

फक्त रंजीत रंजना यांनीच नाही तर याआधी गीतकार स्वानंद किरकिरे यांनीसुद्धा ‘ॲनिमल’ चित्रपटावर जोरदार टीका केली होती. तर दुसरीकडे या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहा दिवसांत कमाईचा तब्बल 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.