हो सके तो माफ करो मुझे.. ‘ॲनिमल’च्या दिग्दर्शकाने का मागितली परिणीतीची माफी?

'ॲनिमल' या चित्रपटातील गीतांजलीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने आधी परिणीती चोप्राची निवड केली होती. मात्र परिणीतीला त्या ताकदीने गीतांजलीची भूमिका कॅमेरासमोर उभी करता न आल्याने दिग्दर्शकाने तिच्या जागी रश्मिकाला निवडलं. याविषयीचा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला.

हो सके तो माफ करो मुझे.. 'ॲनिमल'च्या दिग्दर्शकाने का मागितली परिणीतीची माफी?
Sandeep Reddy Vanga and Parineeti Chopra Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 10:49 AM

मुंबई : 25 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली. मात्र रश्मिका ही संदीपची पहिली पसंत नव्हती. त्याने अभिनेत्री परिणीती चोप्राला ‘ॲनिमल’मधील भूमिकेसाठी विचारलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याबद्दलचा खुलासा केला. इतकंच नव्हे तर तिच्या जागी नंतर रश्मिकाला निवडल्याने संदीपने तिची माफीसुद्धा मागितली होती. “चूक माझीच होती”, अशा शब्दांत त्याने कबुली दिली.

“यात माझीच चूक..”

संदीप म्हणाला, “खरंतर, यात माझीच चूक होती. मी तिला म्हणालो की, शक्य झालं तर मला माफ कर. शूटिंगच्या जवळपास दीड वर्षाआधी मी परिणीतीला साइन केलं होतं. पण काही कारणास्तव मला तिच्यात गीतांजलीची भूमिका दिसत नव्हती. काही भूमिका काही जणांसाठी नसतात. माझा ऑडिशन्समध्ये विश्वास नाही. मी माझ्या मनाने कलाकारांची निवड करतो. पहिल्या दिवसापासून मला परिणीतीचं अभिनय आवडलंय आणि म्हणूनच माझ्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटासाठी मला तिची निवड करायची होती. पण त्यावेळी काही कारणास्तव शक्य झालं नाही. पण मला तिच्यासोबत नेहमीच काम करायचं होतं. हे मी तिलासुद्धा सांगितलं आहे. पण ‘ॲनिमल’च्या वेळी मी तिची माफी मागितली. तिला म्हणालो, मला माफ कर पण माझ्यासाठी चित्रपटापेक्षा मोठं काहीच नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतोय आणि तुझ्या भूमिकेसाठी मी दुसरी अभिनेत्री निवडतोय. सुरुवातीला तिला त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं. पण मला नेमकं काय म्हणायचं होतं, हे तिला नंतर समजलं होतं.”

‘ॲनिमल’साठी रश्मिकाची निवड

‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूरने रणविजय तर रश्मिकाने गीतांजली ही भूमिका साकारली होती. चित्रपटात गीतांजली ही रणविजयची गर्लफ्रेंड असते आणि नंतर तो तिच्याशी लग्न करतो. अभिनेता अनिल कपूरने रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘ॲनिमल’मध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर ‘ॲनिमल’ने चांगली कमाई केली आहे. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 500 आणि जगभरात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचा सीक्वेलसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ॲनिमल पार्क’ असं या सीक्वेलचं नाव असेल. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने नुकतीच ही घोषणा केली. सीक्वेलमध्ये रणबीर कपूर दुहेरी भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.