मुंबईत कोट्यवधींच्या घरात राहते अंकिता लोखंडे, फी आणि नेटवर्थ जाणून बसेल धक्का
Ankita Lokhande Birthday: एकटी अंकिता लोखंड इतक्या कोटींची मालकीण, नवऱ्यासोबत राहते आलिशान घरात, अभिनेत्रीची नेटवर्थ जाणून बसेल धक्का, एकेकाळी वडापाववर भागवली भूक... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडेची चर्चा...
Ankita Lokhande Birthday: टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अंकिता हिला कोणत्या ओळखीची गरज नाही. पण हीच ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्री अनेक वर्ष मेहनत केली. आज अंकिता स्वतःच्या हिंमतीवर आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहे. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अंकिताने कोट्यवधी रुपये कमवले आहे. आज अंकिता लोखंडे हिचं मानधन, रॉयल लाईफ आणि नेटवर्थ बद्दल जाणून घेऊ…
अंकिता लोखंडे हिचा जन्म 19 डिसेंबर 1984 मध्ये इंदौर याठिकाणी झाली. लहानपणापासून अंकिताला अभिनेत्री व्हायचं होतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायानगरीत आली आणि अंकिताचा प्रवास सुरु झाला. फार कमी अभिनेत्री खरं नाव माहिती नाही. तनुजा लोखंडे असं अभिनेत्रीचं नाव आहे. 2005 मध्ये अंकिता मुंबईत आली.
View this post on Instagram
सुरुवातीच्या दिवसांबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं. मुलाखतीत अंकिता म्हणाली होती, ‘मुंबईत करियरसाठी आली तेव्हा फक्त 75 – 100 रुपये मिळायचे. अशात महिन्याची कमाई फक्त 5 हजार व्हायची.’ यामध्ये अंकिताला घराचं भाडं देखील द्यावं लागत होतं. अनेकदा अंकिताने 2 वडापाववर स्वतःची भूक भागवली आहे.
जवळपास 3 – 4 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर अंकिताला 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्या एक संधीनंतर अंकिताने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मालिकेनंतर अंकिताने अनेक लोकप्रिय शोमध्ये देखील काम केलं. एवढंच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीला संधी मिळाली.
View this post on Instagram
आज अंकिताला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी अभिनेत्री लाखो रुपये मानधन घेते. ‘बिग बॉस 17’ शोमध्ये अभिनेत्रीला एका आठवड्यासाठी 12 लाख रुपये मिळायचे…
अंकिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2021 मध्ये अभिनेत्रीने उद्योजक विक्की जैन याच्यासोबत लग्न केलं. आज अभिनेत्री पतीसोबत आलिशान घरात राहते आणि रॉयल आयुष्य जगते. अंकिताच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे रिपोर्टनुसार 30 कोटी रुपये आहे. तर विक्की जैन याच्याकडे 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.