पती विकी जैन बिग बॉसच्या घराबाहेर पडताच अंकिता म्हणाली, “मला अभिमान..”

बिग बॉसचा सतरावा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अंतिम सहा स्पर्धकांपैकी विकी जैनचा प्रवास संपला असून आता ग्रँड फिनालेमध्ये पाच स्पर्धक पोहोचले आहेत. विकीच्या एलिमिनेशननंतर अंकिताला अश्रू अनावर झाले. विकीला मिठी मारत तिने भावना व्यक्त केल्या.

पती विकी जैन बिग बॉसच्या घराबाहेर पडताच अंकिता म्हणाली, मला अभिमान..
Vicky Jain and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 8:23 AM

मुंबई : 24 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या ग्रँड फिनालेसाठी काऊंटडाऊन सुरू झालं आहे. लवकरच या शोचा विजेता घोषित होणार आहे. नुकतंच या शोमध्ये अखेरचं एलिमिनेशन पार पडलं. जवळपास 100 दिवसांनंतर विकी जैनचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. विकीच्या एलिमिनेशननंतर आता ग्रँड फिनालेमध्ये फक्त पाच स्पर्धक पोहोचले आहेत. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा या पाच जणांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. विकीच्या एलिमिनेशननंतर अंकिताला अश्रू अनावर झाले.

एलिमिनेशनची प्रक्रिया सुरू होताच सर्वांत आधी अभिषेक कुमार आणि त्यानंतर मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी हे पहिले तीन स्पर्धक फायनलिस्ट ठरले. त्यानंतर बिग बॉसने अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना चिठ्ठ्या उचलायला सांगितलं. अंतिम निर्णय जाहीर करण्यापूर्वी बिग बॉसने अंकिता आणि विकीला शोमध्ये सहभागी होण्याबद्दल प्रश्न विचारला. “जोडीने या शोमध्ये भाग घेतल्याबद्दल कसं वाटतंय”, असा प्रश्न बिग बॉसने विचारला. त्यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली की, “माझ्यासाठी हा प्रवास खूप कठीण होता. कारण मी घरात सर्वांशी लढले, पण माझ्या पतीसोबत हरले.” तर विकीने सांगितलं की बिग बॉसमध्ये आल्यानंतर तो अंकितासोबतच्या नात्याला आणखी चांगल्याप्रकारे समजू शकला आहे. बिग बॉसमुळे लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांतच एकमेकांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळाली, असं म्हणत त्याने आभार मानले.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यानंतर विकीने जेव्हा चिठ्ठी उघडली, तेव्हा त्यावर ‘एव्हिक्टेड’ (बाद) असं लिहिलेलं होतं. हे पाहिल्यानंतर अंकिताला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. विकीने घरातील प्रत्येक सदस्याला मिठी मारली आणि त्यावेळी अंकिताला अश्रू अनावर झाले. विकीला मिठी मारत त्याच्यावर अभिमान असल्याची भावना तिने व्यक्त केली. “तू हा खेळ खूप चांगला खेळलास. कोणत्याही पाठबळाशिवाय तू इथे आलास, पण शोमध्ये तू स्वत:च्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलंस. तुझी पत्नी असल्याचा मला अभिमान आहे. मी विकी जैनची पत्नी अंकिता लोखंडे आहे, असं मी अभिमानाने बोलू शकते”, असं ती म्हणाली.

विकी घराबाहेर जात असतानाही अंकिता ढसाढसा रडू लागली होती. तेव्हा तिला हसवण्यासाठी विकी म्हणतो, “आता मी बिग बॉसच्या घराबाहेर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करणार आहे.” विकी घराबाहेर गेल्यानंतर अंकिता ही मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि इतरांसमोर मोकळेपणे व्यक्त होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.