Ankita Lokhande | प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन; बेबी बंपच्या फोटोबद्दल म्हणाली..

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळाला. तेव्हापासूनच तिच्या गरोदरपणाची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर अखेर अंकिताने मौन सोडलं आहे.

Ankita Lokhande | प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन; बेबी बंपच्या फोटोबद्दल म्हणाली..
Ankita Lokhande, Vicky JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 9:12 AM

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 14 डिसेंबर 2021 रोजी बॉयफ्रेंड विकी जैनशी लग्नगाठ बांधली. हे लग्न झाल्यापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सतत सोशल मीडियावर होत आहेत. मध्यंतरीच्या काळात अंकिताचे मॉर्फ केलेले फोटोसुद्धा व्हायरल झाले. या मॉर्फ केलेल्या फोटोंमध्ये अंकिताचा बेबी बंप पहायला मिळाला आणि त्यावरून ती गरोदर असल्याची चर्चा होऊ लागली. आता या मॉर्फ केलेल्या फोटोंवर आणि सततच्या गरोदरपणाच्या चर्चांवर अंकिताने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रेग्नंसीच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे.

प्रेग्नंसीच्या चर्चांवर अंकिताचं उत्तर

अंकिता म्हणाली, “या सगळ्या गोष्टींमधून जाणारी मी एकटीच आहे असं मला वाटत नाही. जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा सतत लोक तुम्हाला लग्न कधी होणार, होणार आहे की नाही, लग्न झालंय का असे प्रश्न विचारतात. एकदा का तुमचं लग्न झालं की बाळ कधी होणार, होणार आहे की नाही की बाळ झालंय किंवा तुम्ही प्रेग्नंट आहात का असे प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीच्या गोष्टी सतत लिहिल्या जातात आणि विचारल्या जातात. इतकंच नव्हे तर तुमचा घटस्फोट होऊ शकतो का असेही प्रश्न हल्ली विचारले जातात. मीडियामध्ये हे सगळं चालत राहतं.”

हे सुद्धा वाचा

चर्चांचा परिणाम होतो का?

या चर्चांचा तुझ्यावर काही परिणाम होतो का असा प्रश्न विचारला असता अंकिता पुढे म्हणाली, “मला या चर्चांमुळे काही फरक पडत नाही. मी त्यांचा अजिबात विचार करत नाही. मी अनेकदा माझ्याबद्दलचे मीम्स बघते. युट्यूब आणि सोशल मीडियावर माझे बेबी बंपसोबतचे फोटोसुद्धा मला पाहायला मिळतात. पण त्याकडे मी लक्ष देत नाही. माझे मॉर्फ केलेले फोटो पाहून मला हसायला येतं आणि मला प्रश्न पडतो की खरंच या लोकांकडे काही कामं नाहीत का? ते फक्त अशा पद्धतीचे फोटो एडिट करून त्यांचा टाईमपास करत आहेत.”

बेबी प्लॅनिंगबद्दल काय म्हणाली अंकिता?

अंकिता आणि विकी इतक्यात बेबी प्लॅनिंग करत आहेत का असाही प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला. याविषयी बोलताना ती म्हणाली, “मी कोणतीच गोष्ट प्लॅन करत नाही. जेव्हा देवाची मर्जी असते, तेव्हा सगळं काही घडून येतं. मग ते माझं करिअर असो, लग्न असो किंवा होणारं बाळ असो.. जी गोष्ट जेव्हा व्हायची असेल तेव्हा नक्की होणार. बायोलॉजिकल क्लॉकबद्दलही मी चिंता करत नाही. जेव्हा ज्याला यायचं असेल तेव्हा तो येईल. त्याला कोणीच रोखू शकत नाही. फक्त देवाची इच्छा असायला हवी.”

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.