त्याला पाहून माझे हातपाय थंड पडले, फक्त शरीर..; सुशांतबद्दल पुन्हा व्यक्त झाली अंकिता

अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी व्यक्त झाली. मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिता सुशांतच्या अखेरच्या क्षणांविषयी व्यक्त झाली. तो पूर्णपणे खचला होता, असं ती म्हणाली. अंकिता आणि सुशांत हे सात वर्षे एकमेकांना डेट करत होते.

त्याला पाहून माझे हातपाय थंड पडले, फक्त शरीर..; सुशांतबद्दल पुन्हा व्यक्त झाली अंकिता
Sushant Singh Rajput and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 8:42 AM

मुंबई : 2 जानेवारी 2024 | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या पती विकी जैनसोबत ‘बिग बॉस 17’च्या घरात आहे. अंकिताने घरात अनेकदा दिवंगत अभिनेता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला. या दोघांनी सात वर्षे एकमेकांना डेट केलं होतं आणि त्यानंतर ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अंकिता पूर्णपणे खचली होती. आता बिग बॉसच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिताने पुन्हा एकदा सुशांतचा उल्लेख केला. अखेरच्या क्षणांमधील सुशांतचा फोटो पाहिल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच कोसळली, अशा शब्दांत अंकिता व्यक्त झाली. यावेळी अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली.

या चर्चेची सुरुवात आऊराच्या प्रश्नाने झाली. त्याने अंकिताला विचारलं की ती सोशल मीडियावर लोकांना ब्लॉक करते का? त्याचं उत्तर देताना अंकिता म्हणते, “हो, मी खूप लोकांना ब्लॉक करते. मी याआधीही अनेकांना ब्लॉक केलंय.” त्यानंतर मुनव्वर आऊराला म्हणतो, “मी लोकांना ब्लॉक करत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.” तेव्हा अंकिता स्पष्ट करते, “मी त्यावेळी खूप लोकांना ब्लॉक केलं होतं. कारण माझ्यावर खूप घाणेरड्या शब्दांत टीका केली जात होती. हे मी सहन करू शकत नाही. मी थेट ब्लॉक केलं. मला अशा गोष्टी सांगितल्या गेल्या, ज्या मी कधीच स्वीकारू शकत नाही.” अंकिता सुशांतबद्दल बोलतेय हे समजून मुनव्वर म्हणतो, “ती वेळ खूप वाईट होती.”

हे सुद्धा वाचा

सुशांतच्या निधनानंतर अंकिताने जेव्हा त्याचा फोटो पाहिला, तेव्हाच्या क्षणाबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, “जेव्हा मी त्या फोटोला पाहिलं तेव्हा सर्वकाही संपलं होतं. त्याने असंख्य चित्रपट पाहिले होते आणि त्याक्षणी सर्वकाही संपलं होतं. त्याचा एक फोटो खूप वाईट होता, जो मी पाहिला. तो पाहून माझे हाय-पाय थंड पडले. असं वाटत होतं की तो झोपला आहे. मी फक्त त्या फोटोकडे बघत राहिले आणि विचार केला की त्याच्या डोक्यात किती काय होतं. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्याच्या डोक्यात खूप विचार असतील त्याक्षणी पण ते सर्वकाही संपलं होतं. तेव्हा तुमचं अस्तित्व काहीच नसतं, फक्त शरीर राहतं.”

सुशांतच्या निधनामागचं कारण सांगताना ती मुनव्वरला म्हणाली, “कुठल्या तरी गोष्टीमुळे तो पूर्णपणे खचला होता. असं व्हायला पाहिजे नव्हतं. सुशांतशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी तो काळ खूप कठीण होता. ते सर्व घडलं तेव्हा मी त्याच्या आयुष्यात नव्हते.” अंकिता आणि सुशांत हे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी जवळपास सात वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केलं होतं. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.