दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीला गुपचूप भेटायचा ‘हा’ अभिनेता; तिसऱ्या लग्नाची तर गोष्टच निराळी
एक दोन नाही तर, तीनवेळा विवाहबंधनात अडकला 'हा' अभिनेता; दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पत्नीला विसरू शकला नाही, अभिनेत्याच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट ऐकून तुम्हीही म्हणाल... कमाल आहे...
Annu Kapoor Love story : खरं प्रेम एकाच व्यक्तीवर होतं असं म्हणतात आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं म्हणजे जीवनात मिळालेलं सुख… हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येत आहे. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी एक दोन नाही तर, चक्क तीन वेळा लग्न केलं आणि त्यांच्या प्रेम कहाणी, लग्नाची गोष्ट प्रचंड निराळी आहे. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अन्नू कपूर (Annu Kapoor). अन्नू कपूर यांनी त्यांच्या करियरची सुरुवात १९८३ साली ‘मंडी’ सिनेमातून केली. त्यानंतर अन्नू कपूर यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. अन्नू कपूर कायम त्यांत्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. करियरमध्ये अनेक चढ – उतार अनुभवलेल्या अन्नू कपूर यांच्या लव्हलाईफमध्ये देखील अनेक ट्विस्ट आले. (Annu Kapoor Love story)
अन्नू कपूर यांनी सिनेमांध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. पण अन्नू कपूर यांचं खासगी आयुष्य कायम चर्चेत राहिलं. अन्नू कपूर यांनी दोन लग्न केले आणि त्यांच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट फार निराळी आहे. अन्नू कपूर यांनी १९९२ साली पहिली पत्नी अनुपमा यांच्यासोबत लग्न केलं.
View this post on Instagram
अनुपमा परदेशातील असून त्या अन्नू कपूर यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान होत्या. सुरवातीचे काही वर्ष सुखाने संसार केल्यानंतर अनुपमा आणि अन्नू कपूर यांच्या संसारात वाद होवू लागले. पती – पत्नीमधील वाद इतके टोकाला पोहोचले की, अन्नू कपूर आणि अनुपमा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेत दोघांनी नात्याचा शेवट केला.
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर १९९५ साली अन्नू कपूर यांनी अरुणिता मुखर्जी (arunita Mukherjee) यांच्यासोबत लग्न केलं. पण अन्नू कपूर यांना पहिलं प्रेम कधीच विसरता आलं नाही. दुसऱ्या लग्नानंतर देखील अभिनेत्याला सतत पहिल्या पत्नीची आठवण यायची. त्यांच्या आयुष्यात पहिल्या प्रेमासाठी खास जागा होती.
दुसऱ्या लग्नानंतर देखील अन्नू कपूर आणि पहिली पत्नी अनुपमा गुपचूप हॉटेलमध्ये भेटायचे. घटस्फोटानंतर देखील पती पहिल्या पत्नीला भेटत असल्याचं कळाल्यानंतर अन्नू कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी अरुणिता यांनी नातं संपवण्याचा विचार केला. अखेर अन्नू कपूर आणि अरुणिता यांचं देखील घटस्फोट झालं.
दुसऱ्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर अन्नू कपूर यांनी पुन्हा पहिली पत्नी अनुपमा यांच्यासोबत तिसरं लग्न केलं. ज्यामळे अन्नू कपूर तुफान चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अन्नू कपूर यांना 1984 साली प्रदर्शित झालेल्या ‘उत्सव’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’ , ‘डर’ आणि ‘जॉली एलएलबी 2’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंज केलं.