Anupam Kher | कोण आहे अनुपम खेर यांची पहिली पत्नी? लग्नाच्या एक वर्षानंतरच…
अनुमन खेर यांची पहिली पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री; दोघांचं कॉलेजची प्रेम कहाणी का पाहिली अधुरी? सध्या सर्वत्र अनुपम खेर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीच्या 'लव्ह स्टोरी'ची चर्चा
मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जीला आपण कधीच विसरू शकत नाही. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं, त्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य जगता यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सगळ्यांसोबत असं होत नाही. एवढंच नाही तर, काही व्यक्तींच्या आयुष्यात आवडत्या व्यक्तीची एन्ट्री तर होते पण त्याचं नातं फार काळ टिकू शकत नाही. अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. अनुपम खेर बॉलिवूडच्या अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण अनुपम खेर कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनुपम खेर यांच्या पत्नी म्हणून किरण खेर यांची चर्चा रंगत असते.
सोशल मीडियावर देखील अनुपम आणि किरण यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अनुपम खेर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. अनुपम खेर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव माधुमालती कपूर असं आहे. पण मधुमालती यांच्यासोबत अनुपम खेर यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
मधुमालती आणि अनुपम खेर एकच कॉलेजमध्ये शिकत होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबाच्या माध्यमातून मधुमालती आणि अनुपम खेर यांची ओळख झाली. पहिल्या ओळखीनंतर १९७९ मध्ये मधुमालती आणि अनुपम खेर यांचं लग्न झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
रिपोर्टनुसार, मधुमालती आणि अनुपम खेर एकमेकांसोबत आनंदी नव्हते. त्यामुळे लग्नानंतर मधुमालती आणि अनुपम खेर यांच्या नात्यात अनेक अडचणी येवू लागल्या. सतत होणाऱ्या भांडणांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर लग्नाच्या एकावर्षात मधुमालती आणि अनुपम खेर यांचा घटस्फोट झाला.
अनुपम खेर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मधुमालती यांनी दिग्दर्शक आणि लेखक रंजीत कपूर यांच्यासोबत लग्न केलं. पण मधुमालती यांचं दुसरं लग्न देखील अपयशी ठरलं. त्यानंतर मधुमालती आणि रंजीत कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मधुमालती यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अनुपम खेर यांच्या आयुष्यात अभिनेत्री किरण खेर यांची एन्ट्री झाली.
किरण खेर यांच्यासोबत लग्न करत अनुपम खेर यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. अनुपम यांच्यासोबत किरण यांचं देखील दुसरं लग्न आहे. किरण खेर यांचं पहिलं लग्न गौतम बेरी यांच्यासोबत झालं होतं. किरण खेर आणि गौतम बेरी यांना एक मुलगा देखील आहे. दुसऱ्या लग्नानतंर किरण खेर यांनी मुलाचं नाव सिकंदर खेर असं ठेवलं.
आता आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात मधुमालती आणि अनुपम खेर आनंदी आहे. दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मधुमालती यांनी ‘सोनू की टीटू की स्वीटी’ ‘गदर एक प्रेम कथा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर दुसरीकडे अनुपम खेर कायम त्यांच्या हीट सिनेमांमुळे चर्चेत असतात.
एक गोष्ट अनेकांना थक्क करणारी आहे, ती म्हणजे ५०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण गेल्या काही वर्षांपासून अनुपम खेर यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते, पण ‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमातील त्यांची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली.
67 वर्षीय अभिनेते अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. ‘हाइट’ आणि ‘कार्तिकेय 2’मध्येही त्यांना चाहत्यांकडून पसंती मिळाली आहे. (anupam kher film)