‘अनुपमा’चा सावत्र मुलीविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा; नेमकं काय आहे प्रकरण?

रुपालीच्या सावत्र मुलीने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. ईशा वर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर रुपालीने तिच्या सावत्र मुलीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. रुपालीने 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे.

'अनुपमा'चा सावत्र मुलीविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा; नेमकं काय आहे प्रकरण?
Rupali Ganguly with her husband and stepdaughterImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 12:41 PM

‘अनुपमा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने काही दिवसांपूर्वी तिच्यावर गंभीर आरोप केले होते. आता मुलीच्या या आरोपांविरोधात रुपालीने थेट 50 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. माझी प्रतिमा आणि खासगी आयुष्य मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रुपालीने तिच्या सावत्र मुलीवर केला आहे. ईशाने केलेले सर्व आरोप खोटे आणि प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याचं तिने म्हटलंय.

सावत्र मुलीचे आरोप

रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने 2020 मध्ये तिच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. तीच पोस्ट पुन्हा चर्चेत आली असून रुपालीवर केलेले आरोप खरे असल्याचं तिने स्पष्ट केलं. रुपाली गांगुलीने 2013 मध्ये अश्विन वर्माशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. त्याआधी अश्विनचे दोन लग्न झाले होते. पहिल्या दोन लग्नातून त्याला दोन मुली आहेत. 2020 मध्ये अश्विनची मुलगी ईशाने फेसबुकवर पोस्ट लिहित रुपालीवर गंभीर आरोप केले होते. “रुपाली गांगुलीची खरी कहाणी कोणाला माहीत आहे का? तिचं अश्विन के. वर्माशी बारा वर्षांपर्यंत अफेअर होतं. त्यावेळी ते दुसऱ्यांदा विवाहित होते. अश्विन यांना पहिल्या दोन लग्नातून दोन मुली आहेत. रुपाली ही अत्यंत क्रूर मनाची महिला आहे. तिने मला आणि माझ्या बहिणीला दूर करण्याचा प्रयत्न केला. तिने आम्हाला आमच्याच वडिलांपासून दूर केलं”, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

हे सुद्धा वाचा

रुपालीचा मानहानीचा दावा

याबद्दल रुपालीच्या वकिलांनी त्यांच्या नोटिशीत म्हटलंय, “ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर जी पोस्ट करण्यात आली ती आणि त्यावरील कमेंट्स वाचून रुपालीला खूप मोठा धक्का बसला आहे. यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली आहे. तिला त्यासाठी उपचार घ्यावे लागत असून सेटवरही अपमानाला सामोरं जावं लागतंय. यामुळे तिला भविष्यातील काही कामंही गमवावी लागत आहेत. रुपालीने याप्रकरणी आधी मौन बाळगणं पसंत केलं होतं. मात्र जेव्हा तिच्या 11 वर्षीय मुलाचा त्यात उल्लेख करण्यात आला, तेव्हा तिने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या बदनामीसाठी तिने जाहीर माफीचीही मागणी केली आहे.”

या नोटिशीत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की रुपाली आणि अश्विन वर्मा यांच्यात 12 वर्षे चांगली मैत्री होती. 2009 मध्ये अश्विनने ईशाच्या आईला आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला. त्याआधीपासूनच त्यांची रुपालीसोबत मैत्री होती. इतकंच नव्हे तर रुपाली आणि अश्विन यांनी ईशाला तिच्या करिअरमध्येही मदत केली होती. ईशा सध्या 26 वर्षांची असून ती अश्विन आणि सपना वर्मा यांची मुलगी आहे. ती सध्या अमेरिकेत राहते. अश्विन आणि सपना यांनी 1997 मध्ये लग्न केलं होतं. तर 2008 मध्ये ते विभक्त झाले होते. त्यानंतर अश्विनने 2013 मध्ये रुपालीशी लग्न केलं. या दोघांना रुद्रांश हा मुलगा आहे.

रुपालीच्या पतीचं स्पष्टीकरण

रुपालीसंदर्भातील ईशाची जुनी पोस्ट व्हायरल होताच तिचा पती अश्विनने स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट लिहिली होती. “माझ्या आधीच्या लग्नातून मला दोन मुली आहेत. मी आणि रुपाली याबद्दल नेहमीच स्पष्टपणे बोललो आहोत. मी समजू शकतो की माझ्या छोट्या मुलीच्या मनात तिच्या पालकांच्या घटस्फोटाविषयी फार वेदना आहेत. घटस्फोटाचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. पण संसार मोडण्यामागे अनेक कारणं असतात. माझ्या दुसऱ्या पत्नीसोबतच्या नात्यात बरीच आव्हानं होती. त्यामुळे आम्ही विभक्त झालो होतो. माझी पत्नी आणि माझी मुलं खुश राहावीत हीच माझी इच्छा आहे”, असं त्यांनी लिहिलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.