अनुराग कश्यपची मुलगी सोशल मीडियाद्वारे पैसे कसे कमावते? आलियाने केला खुलासा

अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. विविध ब्रँड डील्स आणि युट्यूब चॅनलद्वारे ती पैसा कसा कमावते, याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला.

अनुराग कश्यपची मुलगी सोशल मीडियाद्वारे पैसे कसे कमावते? आलियाने केला खुलासा
Anurag Kashyap daughter Aaliyah KashyapImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 6:49 PM

मुंबई | 27 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. 22 वर्षीय आलिया सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सनी हजेरी लावली होती. आलियाने नुकतीच तिच्या युट्यूब चॅनलद्वारे फॉलोअर्सच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. सोशल मीडियाद्वारे ती कशा प्रकारे पैसे कमावते, याविषयीही ती व्यक्त झाली. युट्यूब चॅनलद्वारे मिळालेल्या पैशांतून ती तिची लाइफस्टाइल कशी सांभाळते आणि त्याशिवाय तिच्या कमाईचा कोणता स्रोत आहे का, या प्रश्नांचीही उत्तरं तिने दिली.

सोशल मीडियातून कमाई कशी करते?

आलियाला अनेकदा तिच्या कमाईविषयी प्रश्न विचारले गेले. यापैकी तिने दोन प्रमुख प्रश्नांची उत्तरं दिली. ‘सोशल मीडियातून तू कमाई कशी करतेस?’ आणि ‘सोशल मीडिया हा तुझ्या कमाईचा एकमेव स्रोत आहे का’, अशी दोन प्रश्नं तिला विचारली गेली. त्यावर आलिया म्हणाली, “माझ्या कमाईचा 80 टक्के भाग हा ब्रँड डील्सचा आहे आणि प्रत्येक महिन्याला हा आकडा कमी जास्त होत असतो. कारण प्रत्येक महिन्यात मला तेवढेच ब्रँड डील्स मिळत नाहीत. एका महिन्यात मी जास्तीत जास्त सहा ब्रँड डील्स करू शकतो. त्यामुळे दर महिन्याला मी किती कमावते, त्याचा ठराविक आकडा सांगता येणार नाही. कारण प्रत्येक महिन्यात तो आकडा वेगवेगळा असतो.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by aaliyah (@aaliyahkashyap)

युट्यूब चॅनलद्वारेही मिळतो पैसा

“मला युट्यूब चॅनलद्वारेही पैसे मिळतात पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, भारतासारख्या देशातल्या नागरिकांना युट्यूब जास्त पैसे देत नाही. अमेरिकेत राहणाऱ्या युट्यूबरला माझ्या तुलनेत अधिक पैसा मिळतो. त्यामुळे दर महिन्याला मला किती व्ह्यूज मिळाले, त्यावरून युट्यूब मला पैसे देते. पण हे पैसे मला पुरत नाहीत”, असंही तिने पुढे सांगितलं. आलिया सध्या फक्त सोशल मीडियाद्वारे पैसे कमावत असली तरी तिला लवकरच स्वत:चा बिझनेस सुरू करायचा आहे. काही महिन्यांपूर्वी तिने ज्वेलरी बिझनेस सुरू केला होता. मात्र पुरवठ्याच्या समस्येमुळे तिला हा बिझनेस बंद करावा लागला होता.

कोण आहे अनुराग कश्यपचा होणारा जावई?

आलियाने नुकताच बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइरशी साखरपुडा केला. हे दोघं 2025 मध्ये लग्न करणार आहे. 22 वर्षीय आलिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.अनुराग कश्यपचा होणारा जावई शेन ग्रेगॉइर हा 23 वर्षांचा आहे. तो अमेरिकन उद्योजक आहे. रॉकेट पॉवर्ड साऊंड या नावाच्या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी साऊंड डिझाइनिंग आणि म्युझिक प्रॉडक्शन स्किल डेव्हलपमेंट करते. आलिया सोशल मीडियावर नेहमीच शेनसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसते. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.