अनुराग कश्यपच्या लेकीने शेअर केला हॉट फोटो, ‘सोशल मीडियावर जाळ अन् धुर संगटच….!’
पाठीमागच्या काही दिवसांपासून आलिया वेगवेगळ्या पोझमधले फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. | Aaliyah Kashyap Share hot Photo on Social media
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) लेक सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते तसंच तिच्याविषयी नेहमी सोशल मीडियावर चर्चा असते. यावेळी तिने एक हॉट आणि सेक्सी फोटो पोस्ट अपलोड केलाय ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आलीये. अनुराग कश्यपची लेक आलीया कश्यप सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या पोझेसचे फोटो अपलोड करत असते. त्या माध्यमातून ती तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यावेळी मात्र तिने भलताच बोल्ड फोटो अपलोड केलाय ज्यामुळे युझर्सचं चित्त थाऱ्यावर लागत नाहीये. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर ‘जाळ आणि धूर संगट’च काढला आहे. ( Anurag Kashyap Daughter Aaliyah Share hot Photo on Social media)
View this post on Instagram
आलियाच्या या फोटोवर काही फॅन्सनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. अंगप्रदर्शन करावं पण त्याला काही माप असते? इतकं अति नसतं, अशा प्रकाराच्या कमेंट्स काही युझर्सने व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी मात्र तिला थेट भारतीय संस्कृतीची आठवण करुन दिली आहे.
पाठीमागच्या काही दिवसांपासून आलिया वेगवेगळ्या पोझमधले फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दिवसेंदिवस तिच्या फॉलोवर्समध्येही वाढ होत आहे. बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केल्याने लोकंही तिला फॉलो करताना दिसून येत आहे. यावेळेसचा फोटो मात्र भलताच बोल्ड असल्याने काही चाहत्यांनी तिला सबुरीने घेण्याचा सल्ला दिलाय.
लेकीच्या बॉलिवूडमधील आगमनावर काय म्हणतो अनुराग कश्यप
काही दिवसांपूर्वी लेक आलियाच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीच्या प्रश्नाच्या प्रश्नावर अनुराग कश्यप म्हणाला, “ती आणखी छोटी आहे. ती स्वत: ठरवेल की तिला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय. अजून आलियाला खूप काही शिकायचंय… असं होत नाही की एक दिवस म्हणाली मला अभिनेत्री व्हायचंय आणि दुसऱ्या दिवशी ती अभिनेत्री झाली.. त्यासाठी भरपूर मेहनतीची गरज असते”
“जर तिला अॅक्टिंग करायची असेल तर तिला आधी अॅक्टिंगचे धडे गिरवावे लागतील. त्यासाठी तिला स्ट्रगल करावा लागेल. काही ठिकाणी ऑडिशन द्याव्या लागतील. ज्या मेहनतीच्या जोरावर पास कराव्या लागतील. मला वाटतं नाही की मी ज्या प्रकारच्या फिल्मस बनवतो त्यासाठी आलिया बरोबर असेल”, असं उत्तर अनुरागने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
संबंधित बातम्या :
Video | रितेशसोबत नाचताना खाली पडली जेनेलिया, अभिनेत्याने शेअर केला गमतीदार व्हिडीओ!
कुणाच्याही वाट्याला असे दिवस येऊ नयेत, लग्न झाल्यानंतर या 5 अभिनेत्रींनी नरक यातना सोसल्या…!
( Anurag Kashyap Daughter Aaliyah Share hot Photo on Social media)