गौरी-सुहाना खानसोबत अभिनेत्रीला काढायचा होता फोटो; शाहरुखच्या पत्नीने तोंडावर दिला नकार

पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये अनुषा आधी गौरी आणि सुहाना खान यांच्याशी बोलत असते आणि फोटोसाठी पोज देण्यासाठी उभी राहते.

गौरी-सुहाना खानसोबत अभिनेत्रीला काढायचा होता फोटो; शाहरुखच्या पत्नीने तोंडावर दिला नकार
गौरी-सुहाना खानसोबतच्या 'त्या' व्हिडीओमुळे अनुषा दांडेकर ट्रोलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 4:05 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर नीता आणि मुकेश अंबानी यांच्या कल्चरल लाँच इव्हेंटची जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमाला केवळ देशभरातील सेलिब्रिटी नव्हे तर परदेशातील नामवंत कलाकारांनीही हजेरी लावली. ‘स्पायडर मॅन’ फेम अभिनेता टॉम होलँड, झेंडाय, सुपरमॉडेल गिगी हदिद यांसारखे सेलिब्रिटी या कार्यक्रमाला ग्लॅमरस अंदाजात उपस्थित होते. बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खानपासून आलिया भट्ट, करीना कपूर खान हे सेलिब्रिटीसुद्धा कार्यक्रमाला पोहोचले होते. यावेळी शाहरुख खानची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान यांनी एकत्र एण्ट्री करत सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र पापाराझींसमोर फोटो क्लिक करताना अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत असं काही घडलं, जे पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर आधी गौरीने सुहाना आणि आर्यन यांच्यासोबत फोटो क्लिक केले. यावेळी सलमान खाननेही या तिघांसोबत येऊन फोटो काढला. मात्र नंतर जेव्हा अभिनेत्री अनुषा दांडेकर त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी आली, तेव्हा काहीतरी वेगळंच घडल्याचं पहायला मिळालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये अनुषा आधी गौरी आणि सुहाना खान यांच्याशी बोलत असते आणि फोटोसाठी पोज देण्यासाठी उभी राहते. मात्र तितक्यात गौरी नकारार्थी मान हलवत तिला काहीतरी म्हणते आणि त्यानंतर मुलगी सुहानासोबत ती तिथून निघून जाते. गौरीने अनुषासोबत फोटो काढण्यास नकार दिला, असा अंदाज नेटकरी या व्हिडीओवरून लावत आहेत. याचमुळे अनुषाला ट्रोल केलं जातंय.

‘आता नको, नंतर फोटो काढू.. असं म्हणून गौरीने तिचा अपमान केला’, असं एकाने लिहिलंय. तर मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी फोटो काढायला गेली मात्र स्वत:चाच अपमान करून बसली, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अनुष्काला गौरीने भावच दिला नाही’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

अनुषा दांडेकर ही अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकरची ती बहीण आहे. टीव्ही अभिनेता करण कुंद्रासोबतच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.