AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्यावर खरंच दैवी आशीर्वाद’; सेमी फायनलमधील विजयानंतर विराटसाठी अनुष्काची पोस्ट चर्चेत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमधील विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने विराटचं भरभरून कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर दैवी आशीर्वाद असल्याचं तिने म्हटलं आहे. अनुष्काची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

'तुझ्यावर खरंच दैवी आशीर्वाद'; सेमी फायनलमधील विजयानंतर विराटसाठी अनुष्काची पोस्ट चर्चेत
Virat - Anushka Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2023 | 12:50 PM
Share

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | विराट कोहलीच्या विक्रमी 50 व्या शतकानंतर मोहम्मद शमीने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळविला. सचिन तेंडुलकरचं घरचं मैदान असलेल्या वानखेडेवर सचिनचा 49 वनडे सेंच्युरींचा विक्रम विराट कोहली मोडीत काढतो का, याकडे सर्वांचं लक्ष होतं. कोहलीनेही चाहत्यांना निराश केलं नाही. त्याने 113 चेंडूंत 117 धावांची अप्रतिम खेळी केली. देशभरातील क्रिकेटप्रेमींकडून आणि सेलिब्रिटींकडून कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास पोस्ट लिहून स्तुती केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने कोहलीला ‘देवाचा मुलगा’ असं म्हटलंय.

अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या ऐतिहासिक शतकावर आनंद जाहीर करत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली. ‘देव हा सर्वोत्तम कथालेखक आहे. तुझ्या प्रेमाच्या रुपात मला आशीर्वाद दिल्याबद्दल मी देवाची मनापासून ऋणी आहे. तुला पुढे जाताना पाहणं, तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होताना पाहणं, स्वत:सोबत आणि खेळासोबत नेहमीच प्रामाणिक असलेलं पाहणं माझ्यासाठी सौभाग्याचं आहे. तू खरंच देवाचा मुलगा आहेस’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

अनुष्काची पोस्ट

विराट कोहलीनेही हे सर्व स्वप्नवत असल्याचं म्हटलंय. ‘हे सगळं वास्तवाच्या पलीकडचं आहे. आजच्या सामन्यात हे सगळं जुळून आलं. अनुष्का इथेच होती, सचिन पाजी स्टँडमध्ये होते.. माझी जीवनसाछी, माझा हिरो आणि वानखेडेवरचे हे सगळे क्रिकेटप्रेमी.. हे सगळं शब्दांत मांडणं कठीण आहे. जर मी सुंदर चित्र रेखाटू शकत असतो, तर कदाचित ते असंच असतं’, अशा शब्दांत विराटने भावना व्यक्त केल्या.

सेमी फायनलदरम्यान अनुष्का सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली होती. विराट आणि टीम इंडियासाठी चिअर करतानाचे अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यादरम्यान दोघांचा खास क्षणसुद्धा कॅमेरात टिपला गेला. यामध्ये विराट आणि अनुष्का एकमेकांना फ्लाइंग किस करताना दिसले. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.