Anushka Sharma | प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. इटलीत मोजकेच कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. तर 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्काने वामिकाला जन्म दिला. या दोघांनी मुलीला माध्यमांपासून दूरच ठेवणं पसंत केलंय.

Anushka Sharma | प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Anushka SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 9:29 PM

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या दुसऱ्या गरोदरपणाच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काला एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर अद्याप अनुष्का किंवा तिचा पती आणि क्रिकेटर विराट कोहलीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अशातच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेल्या मजकुराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अनुष्काने ही पोस्ट तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळेच लिहिली, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

अनुष्काने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एक खुर्चीवर बसलेला व्यक्ती आणि त्याच्या मांडीवर एक पुस्तक दिसत आहे. यासोबतच त्यावर लिहिलंय, ‘जेव्हा तुम्हाला समजेल की प्रत्येक मत हे वैयक्तिक इतिहासाने भरलेली दृष्टी आहे, तेव्हा तुम्हाला हे समजण्यास सुरुवात होईल की सर्व निर्णय म्हणजे केवळ एक कबुलीजबाब आहेत.’

हे सुद्धा वाचा

अनुष्का प्रेग्नंसीच्या दुसऱ्या तिमाहीत असून गरोदरपणाच्या अखेरच्या टप्प्यात ती याबद्दल जाहीर करेल, असंही म्हटलं जात आहे. या चर्चांदरम्यान विराट कोहली अचानक मुंबईला परतला आहे. वर्ल्ड कप 2023 साठी गुवाहाटीमध्ये वॉर्म-अप मॅचमध्ये व्यग्र असलेल्या विराटला तातडीने मुंबईला यावं लागलं आहे. पर्सनल इमर्जन्सीचं कारण देत तो परतल्याचं कळतंय.

पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी विराट गुवाहाटीहून मुंबईसाठी इमर्जन्सी फ्लाइटने आला. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विराट मंगळवारी तिरुवनंतपुरममध्ये नेदरलँडविरोधातील टीम इंडियाच्या आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कपच्या दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये व्यग्र होता. यादरम्यान तो अचानक मुंबईला परतला असून त्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्काने कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ती जाणूनबुजून माध्यमांपासून आणि पापाराझींपासून दूर राहतेय, असं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर ती विराटसोबत कोणत्याच सामन्याला हजेरी लावत नव्हती. विराट आणि अनुष्का यांना नुकतंच मॅटर्निटी क्लिनिकबाहेरही पाहिलं गेलं होतं. त्यावेळी त्यांनी पापाराझींना फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. या सर्व गोष्टींमुळे अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.