World Cup 2023 | ऑस्ट्रेलियावर विजय मिळवताच अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत शेअर केला ‘या’ क्रिकेटरचा फोटो

टीम इंडियाने या विजयासह चेन्नईतील ऑस्ट्रेलियाचा 36 वर्षांचा हिशोब चुकता केला. याआधी 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नईत आमनेसामने होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 1 धावाने रोमहर्षक विजय मिळवला होता. आता 36 वर्षांनी टीम इंडियाने हिशोब पूर्ण केला.

World Cup 2023 | ऑस्ट्रेलियावर विजय मिळवताच अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत शेअर केला 'या' क्रिकेटरचा फोटो
Anushka and ViratImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 11:20 AM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : रविवारी संपूर्ण देशभरात जल्लोषाचा माहौल पाहायला मिळाला. केएल राहुल आणि विराट कोहली यांची झुंजार बॅटिंग आणि त्यापूर्वी रवींद्र जडेजाने केलेली बॉलिंग याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी आणि 52 चेंडू राखून नमवलं. भारताच्या या विजयात विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. म्हणूनच देशभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विजयाबद्दल विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

अनुष्का शर्माची पोस्ट

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आयसीसीची एक पोस्ट शेअर केली आहे. आयसीसीच्या या पोस्टमध्ये विराट कोहलीसोबत केएल राहुल पाहायला मिळतोय. या दोघांचा फोटो शेअर करत अनुष्काने निळ्या रंगाचा हृदयाचा इमोजी त्यावर पोस्ट केला आहे. अनुष्कासोबतच सोशल मीडियावर असंख्य क्रिकेटप्रेमी विराट कोहली आणि टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत.

भारताने सुरुवातीच्या दोन ओव्हर्समध्ये इशान किशन, कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर असे आघाडीचे तीन फलंदाज गमावले. हे तिघंही खातं न उघडता बाद झाले. त्यावेळी आव्हानात्मक स्थितीत विराट कोहली आणि केएल राहुल यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं. दोघांनी 164 धावांची अप्रतिम भागीदारी रचली. त्यामुळे भारताने 200 धावांचं आव्हान 41.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. विराट आणि राहुलने एक-दोन धावांवर भर दिला. तर दोघांनी मिळून 14 चौकार आणि दोन षटकार मारले.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं 199 धावांवर पॅकअप केलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने 46 आणि डेव्हिड वॉर्नर याने 41 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेन याने 27 आणि अखेरच्या क्षणी मिचेल स्टार्क याने 28 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना टीम इंडियाच्या गोलंदाजांना हात खोलण्यापासून रोखलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.