Virat Anushka | विराट-अनुष्काने 100 संतांसाठी आयोजित केला भंडारा; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
याचसोबत त्यांनी वस्त्र आणि दक्षिणा भेट देऊन संतांचा आशीर्वाद घेतला. यावेळी विराट कोहलीला भेटण्यासाठी डीजीपी अशोक कुमारसुद्धा दयानंद आश्रममध्ये पोहोचले. विराट-अनुष्काच्या या भेटीदरम्यान सुरक्षाव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ऋषिकेश: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या उत्तराखंडमध्ये धार्मिक यात्रा करत आहेत. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ते ऋषिकेशमधील स्वामी दयानंद आश्रमात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. या अनुष्ठानानंतर विराट आणि अनुष्काने भंडाऱ्याचं आयोजन करत संतांच्या भोजनाची व्यवस्था केली. याचसोबत त्यांनी वस्त्र आणि दक्षिणा भेट देऊन संतांचा आशीर्वाद घेतला. यावेळी विराट कोहलीला भेटण्यासाठी डीजीपी अशोक कुमारसुद्धा दयानंद आश्रममध्ये पोहोचले. विराट-अनुष्काच्या या भेटीदरम्यान सुरक्षाव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पत्नी आणि अभिनेत्री अनुष्कासोबत विराट सोमवारी शीशमझाडी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू स्वामी दयानंद सरस्वतींच्या आश्रमात पोहोचला होता. इथं विराटने पत्नी आणि आई सरोज कोहलीसह स्वामी दयानंद सरस्वती यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. याठिकाणी कोहलीने 20 मिनिटं ध्यानसाधनाही केली.
सोमवारी सकाळी विराट कुटुंबीयांसह ऋषिकेशजवळील यमकेश्वर क्षेत्रातील एका जंगल रिसॉर्टमध्ये पोहोचला होता. संध्याकाळी विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि सरोज कोहली यांनी दयानंद आश्रमात अध्यक्ष स्वामी साक्षातकृतानंद यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर विराटने कुटुंबीयांसह आश्रममधील शंकराच्या मंदिरात पूजा केली. विराट आणि अनुष्काने घाटावर संध्याकाळी गंगा आरतीसुद्धा केली.
Virat Kohli and Anushka Sharma organised Bhandara for saints in Rishikesh and took their blessings. pic.twitter.com/fzypKcgc1B
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 31, 2023
विराट आणि अनुष्का हे काही दिवसांपूर्वीच नीम करौली बाबा यांच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमुकली वामिकासुद्धा होती. महाराजांसोबत विराटने अध्यात्मिक चर्चासुद्धा केली होती आणि त्यांचा आशीर्वाद घेतला होता. आश्रममध्ये पार पडलेल्या या सत्संगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.