Vamika: वृंदावनच्या आश्रमातील विराट-अनुष्काच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल!

वामिकासोबत विराट-अनुष्का पोहोचले आश्रमात; व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते झाले खुश!

Vamika: वृंदावनच्या आश्रमातील विराट-अनुष्काच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल!
आई अनुष्कासोबत बसलेल्या चिमुकल्या वामिकाची मस्ती पाहिलीत का?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 11:36 AM

वृंदावन: अभिनेता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नवीन वर्षाची सुरुवात अध्यात्मिक दौऱ्याने केली. मुलगी वामिकासोबत हे दोघं नुकतेच वृंदावनला गेले होते. याठिकाणी त्यांनी हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली. या आश्रमात ते बराच वेळ थांबले होते. महाराजांसोबत विराटने अध्यात्मिक चर्चासुद्धा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आश्रममध्ये पार पडलेल्या या सत्संगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील चिमुकल्या वामिकाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

गुरुवारी विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत नीम करोली बाबांचं आश्रम आणि समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माँ आनंदमई यांच्या आश्रमातही गेले. तर संध्याकाळी 4 वाजता ते वृंदावनमधील हेलिपॅडवरून हेलीकॉप्टरने दिल्लीला रवाना झाले. विराट-अनुष्काच्या वृंदावन दौऱ्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये चिमुकली वामिकासुद्धा आई-वडिलांसोबत आश्रमात बसलेली पहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by @virushka_always1801

या व्हिडीओत वामिकाला पाहून चाहते खुश झाले आहेत. या व्हिडीओत तिचा चेहरा पहायला मिळत नाही. मात्र आईच्या मांडीवर बसलेली वामिका आणि तिची मस्ती त्यात स्पष्ट पहायला मिळतेय. स्वामीजी अनुष्काला ओढणी देतात आणि वामिकाच्या गळ्यात माळ घालतात. वामिकाला असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आल्याने विराट-अनुष्काच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

विराट-अनुष्काने अद्याप वामिकाचा चेहरा माध्यमांना दाखवला नाही. तिचे फोटो किंवा व्हिडीओ न काढण्याची विनंती त्यांनी पापाराझी, फोटोग्राफर्स आणि माध्यमांना केली आहे. मात्र तरीही विराटच्या एका सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या विंगेत वामिकाला घेऊन उभ्या असलेल्या अनुष्काचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात वामिकाचा चेहरा स्पष्ट पहायला मिळाला होता. त्यानंतर विराट आणि अनुष्काने पोस्ट लिहित युजर्सना ते डिलिट करण्याची विनंती केली होती.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.