बॉलिवूड जोडप्यांमध्ये घटस्फोटामागचं नेमकं कारण काय? ए. आर. रेहमान यांच्या पूर्व पत्नीच्या वकिलाने केलं स्पष्ट

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान आणि सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर घटस्फोट जाहीर केला. गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. आता सायरा बानू यांच्या वकिलाने त्यामागील संभाव्य कारणं सांगितली आहेत.

बॉलिवूड जोडप्यांमध्ये घटस्फोटामागचं नेमकं कारण काय? ए. आर. रेहमान यांच्या पूर्व पत्नीच्या वकिलाने केलं स्पष्ट
A R Rahman and Saira BanuImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 10:52 AM

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी मंगळवारी घटस्फोट जाहीर केला. लग्नाच्या 29 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सायराने तिची वकील वंदना शाहच्या माध्यमातून घटस्फोटाच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. हा घटस्फोट जाहीर करण्याच्या काही दिवस आधी वकील वंदना शाह यांनी एका पॉडकास्टमध्ये बॉलिवूड जोडप्यांच्या घटस्फोटामागील काही कारणं सांगितली होती. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटस्फोटामागचं कारण काय?

दीपक पारीकच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वंदना म्हणाल्या, “त्यांचं आयुष्य इतरांपेक्षा खूप वेगळं असतं. मला वाटत नाही की फसवणूक किंवा अप्रामाणिकपणा हे संसार मोडण्यामागचं कारण असेल. खरं कारण हा कंटाळा आहे. विवाहित जोडप्यांना वाटतं की त्यांनी सर्व पाहिलंय. हे बॉलिवूड आणि अतिश्रीमंत कुटुंबांसाठी खूप विलक्षण आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी मी इतर बऱ्याच वैवाहिक जोडप्यांच्या आयुष्यांमध्ये पाहिली नाही.”

हे सुद्धा वाचा

“दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या लैंगिक अपेक्षा या खूप इतरांपेक्षा खूप भिन्न आहेत. बॉलिवूडची पार्श्वभूमी नसलेल्या वैवाहिक जोडप्यांपेक्षा त्यांच्या लैंगिक अपेक्षा खूप जास्त आहेत. तिसरं कारण म्हणजे व्याभिचार. हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि वन-नाइट स्टँडमध्येही काही चुकीचं मानलं जात नाही. मी बॉलिवूडचा एक भाग नाही पण माझ्याकडे आलेल्या केसेसवरून मी ही निरीक्षणं नोंदवतेय”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

सेलिब्रिटींचे घटस्फोट

गेल्या काही वर्षांत मलायका अरोरा-अरबाज खान, सोहैल खान-सीमा सजदेह, हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोविक, आमिर खान-किरण राव, मसाबा गुप्ता-मधु मंटेना, अर्जुन रामपाल-मेहेर जेसिया, समंथा रुथ प्रभू-नाग चैतन्य, जयम रवी-आरती, धनुष-ऐश्वर्या रजनिकांत या जोडप्यांनी घटस्फोट जाहीर केला. यात आता ए. आर. रेहमान आणि सायरा बानू यांचीही भर पडली आहे. या दोघांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना खतिजा, रहीमा आणि आमीन ही तीन मुलं आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.