AR Rahman | ‘हिंदीत बोलू नकोस’, ए. आर. रेहमान यांनी पत्नीला सर्वांसमोर रोखलं अन्..

ए. आर. रेहमान यांनी आजवर विविध भाषांमध्ये काम केलं आहे. मात्र तमिळ भाषेवर त्यांचं खूप जास्त प्रेम आहे. 99 सॉग्सच्या लाँचच्या कार्यक्रमात रेहमान स्टेजवरून उतरून निघून गेले होते. कारण ईहान भट्टने त्यांना हिंदी भाषेत प्रश्न विचारला होता.

AR Rahman | 'हिंदीत बोलू नकोस', ए. आर. रेहमान यांनी पत्नीला सर्वांसमोर रोखलं अन्..
A R Rahman with wifeImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 8:34 AM

चेन्नई : ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका पुरस्कार सोहळ्यात मंचावर उभ्या असलेल्या पत्नीला हिंदीत नव्हे तर तमिळ भाषेत बोलायला सांगत आहेत. चेन्नईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्यांनी पत्नी सायरा बानू यांच्यासोबत हजेरी लावली होती. यावेळी सूत्रसंचालक सायरा यांना बोलण्यासाठी मंचावर बोलावतात. हा व्हिडीओ एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर ए. आर. रेहमान तमिळ भाषेत म्हणतात, “मला माझ्या मुलाखती पुन्हा पहायला आवडत नाहीत. माझी पत्नी माझ्या मुलाखतीत पुन्हा – पुन्हा पाहत असते, कारण तिला माझा आवाज आवडतो.” हे ऐकून त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या सायरा स्मितहास्य करतात. त्यानंतर सूत्रसंचालक सायरा यांना दोन शब्द बोलण्यास सांगतो. यावेळी त्या काही बोलण्याआधीच ए. आर. रेहमान त्यांना म्हणतात, “हिंदीत बोलू नकोस, तमिळमध्ये बोल.” यावेळी वरमलेल्या सायरा काही सेकंदासाठी डोळे बंद करतात आणि म्हणतात ‘अरे देवा’. हे पाहून उपस्थित प्रेक्षक हसू लागतात आणि टाळ्यांचा कडकडाट करतात.

हे सुद्धा वाचा

सायरा पुढे म्हणतात, “सर्वांना शुभसंध्याकाळा. माफ करा मी तमिळ अत्यंत सहजपणे बोलू शकत नाही. मी खूप खुश आणि उत्सुक आहे कारण त्यांचा आवाज माझा सर्वांत आवडता आवाज आहे. मी त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले होते. इतकंच मी म्हणू शकते.” ए. आर. रेहमान यांनी सायरा बानू यांच्याशी 1995 मध्ये लग्न केलं. या दोघांना खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुलं आहेत.

पहा व्हिडीओ

ए. आर. रेहमान यांनी आजवर विविध भाषांमध्ये काम केलं आहे. मात्र तमिळ भाषेवर त्यांचं खूप जास्त प्रेम आहे. 99 सॉग्सच्या लाँचच्या कार्यक्रमात रेहमान स्टेजवरून उतरून निघून गेले होते. कारण ईहान भट्टने त्यांना हिंदी भाषेत प्रश्न विचारला होता. त्यावेळचा ईहान आणि रेहमान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

ए. आर. रेहमान यांनी मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाला संगीत दिलं आहे. या चित्रपटाला दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये चियान विक्रम, त्रिशा कृष्णन, कार्तिक शिवकुमार, जयम रवी, ऐश्वर्या राय यांच्या भूमिका आहेत. येत्या 28 एप्रिल रोजी ‘पोन्नियिन सेल्वन 2’ प्रदर्शित होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.