मलायका अरोरासोबत कसं आहे नातं? पहिल्यांदाच अरबाज खानची गर्लफ्रेंड झाली व्यक्त

अरबाजच्या गर्लफ्रेंडने पहिल्यांदाच केला मलायकचा उल्लेख; तर 'खान' कुटुंबीयांविषयी म्हणाली..

मलायका अरोरासोबत कसं आहे नातं? पहिल्यांदाच अरबाज खानची गर्लफ्रेंड झाली व्यक्त
अरबाज आणि जॉर्जिया गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 9:53 AM

मुंबई: अभिनेता अरबाज खान गेल्या काही वर्षांपासून मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करतोय. जॉर्जियाने तिच्या या रिलेशनशिपबद्दल नेहमीच मौन बाळगलं आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल माध्यमांमध्ये झालेली चर्चा तिला नापसंत आहे. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जिया पहिल्यांदाज अरबाज आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली. इतकंच नव्हे तर अरबाजची एक्स-वाइफ मलायका अरोराबद्दलही तिने पहिल्यांदाच वक्तव्य केलं.

जॉर्जिया आणि अरबाज गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2018 पासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा या दोघांना डिनर डेटवर, फिरायला किंवा पार्ट्यांना जाताना पाहिलं गेलंय. अरबाज आणि मलायकाने 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता.

हे सुद्धा वाचा

मलायकाशी कधी तुझी भेट झाली का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “होय, अनेकदा. मला ती खूप आवडते आणि तिच्या प्रवासाचं मला खूप अप्रूप आहे. तिने शून्यापासून करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंग करत हळूहळू तिने इथपर्यंतचा प्रवास गाठला. त्यासाठी माझ्याकडून तिला सलाम. माझ्यासाठी ती खरीच अशी व्यक्ती आहे, जिच्या कामाची मी खूप प्रशंसा करते.”

अरबाजच्या कुटुंबीयांबद्दल बोलताना जॉर्जिया पुढे म्हणाली, “ते खूप चांगले आहेत. अरबाजचे कुटुंबीय खुल्या विचारांचे आणि सहजतेने दुसऱ्याला स्वीकारणारे आहेत. माझा त्यांच्यासोबतचा आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे.”

अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयात 22 वर्षांचं अंतर आहे. याविषयी अरबाजने एका मुलाखतीत मौन सोडलं होतं. “आम्हा दोघांच्या वयात खूप मोठं अंतर आहे. पण त्याची जाणीव आम्हाला कधीच झाली नाही”, असं तो म्हणाला होता.

दुसरीकडे मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. या दोघांच्या वयातही बरंच अंतर आहे. घटस्फोटानंतरही अरबाज आणि मलायका त्यांच्या मुलासाठी अनेकदा एकत्र येताना दिसतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.