अभी तो पार्टी शुरू.. अरबाजच्या लग्नात रवीन टंडन काय नाचली! एकदा VIDEO बघाच

अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी त्याने रविवारी लग्न केलं. बहीण अर्पिता खानच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी उपस्थित होते. रवीना टंडनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे,

अभी तो पार्टी शुरू.. अरबाजच्या लग्नात रवीन टंडन काय नाचली! एकदा VIDEO बघाच
Arbaaz Khan and Raveena TandonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 7:56 AM

मुंबई : 25 डिसेंबर 2023 | अभिनेता अरबाज खानने रविवारी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा लग्न केलं. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या घरी हे लग्न पार पडलं होतं. या लग्नानंतर सोशल मीडियाद्वारे अनेक सेलिब्रिटी अरबाज आणि शुराला शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती अरबाजसोबतच डान्स करताना दिसतेय. शुरा ही रवीनाची मेकअप आर्टिस्ट आहे, त्यामुळे या लग्नसोहळ्यात तिचा सहभाग अत्यंत खास मानला जात आहे. लग्नानंतर रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मुबारक, मुबारक, मुबारक.. शुरा खान आणि अरबाज खान. तुम्हा दोघांसाठी मी खूप खुश आहे. अभी तो पार्टी शुरू हुई है. मिस्टर अँड मिसेस शुरा अरबाज खान’, अशा शब्दांत रवीनाने आनंद व्यक्त केला आहे. अरबाज आणि शुरा यांची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र दोघांनीही आपलं नातं खासगी ठेवलं होतं. लग्नाबद्दल अद्याप अरबाजने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी अरबाजने अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. 2016 मध्ये दोघांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. अखेर 11 मे 2017 रोजी अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट झाला. लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

56 वर्षीय अरबाज हा गेल्या काही वर्षांपासून मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने एका मुलाखतीत अरबाजशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला. अरबाज आणि शुराच्या लग्नाला आई सलमा खान, सावत्र आई हेलन, भाऊ सोहैल आणि सलमान खान, मुलगा अरहान खान यांच्यासह बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी, साजिद खान यांचा त्यात समावेश होता.

कोण आहे शुरा खान?

शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असून तिचे 13.2 हजार फॉलोअर्स आहेत. शुराने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलंय. अरबाज आणि शुराची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.