‘तुझ्या शिवाय दुसरं कोणीच मला आनंदी ठेवू शकत नाही…’, पत्नीसोबत ‘ते’ फोटो पोस्ट करत अरबाज खान याने प्रेम केलं व्यक्त

Arbaaz Khan : 'तुझ्या शिवाय दुसरं कोणीच आनंदी ठेवू शकत नाही आणि...', दुसऱ्या पत्नीसोबतचे खास फोटो पोस्ट करत अरबाजने केलं प्रेम व्यक्त, नेटकरी म्हणाले, 'मलायका देखील असंच बोलला असशील...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज याच्या पोस्टची चर्चा...

'तुझ्या शिवाय दुसरं कोणीच मला आनंदी ठेवू शकत नाही...', पत्नीसोबत 'ते' फोटो पोस्ट करत अरबाज खान याने प्रेम केलं व्यक्त
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 3:01 PM

मुंबई | 18 जानेवारी 2024 : अभिनेता अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी 41 वर्षीय शूरा खान हिच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज खान आणि शूरा खान यांनी मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेता दुसऱ्या पत्नीसोबत हनीमूनसाठी देखील गेला होता. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. आता पुन्हा अरबाज त्याच्या दुसऱ्या पत्नीमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. अरबाज याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुसऱ्या पत्नीवर प्रेम व्यक्त केलं आहे.

अरबाज खान याने दुसरी पत्नी शुरा खान हिच्या वाढदिवसाचं निमित्त साधत दोघांचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये प्रेम व्यक्त केलं. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा शुरा… तुझ्या शिवाय दुसरं कोणीच मला इतकं आनंदी ठेवू शकत नाही. माझं उर्वरीत आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचं आहे. देव आपल्या दोघांना एकत्र घेवून आला… हिच माझ्यासाठी सर्वात महत्त्वीची गोष्ट आहे…’

पुढे अरबाज म्हणाला, ‘जेव्हा पहिल्यांदा मी तुझ्यासोबत डेटवर आलो होतो, तेव्हाच मला कळलं होतं की, मी माझं आयुष्य तुझ्यासोबत जगणार आहे. तुझ्या सौंदर्याने तू मला कायम घायाळ करतेस… रोज मला एका क्षणाची आठवण होते, जेव्हा मी तुला ‘कबूल हैं’ म्हणालो… हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास शब्द आहेत, जे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी बोललो आहे… आय लव्ह यू…’ सध्या अरबाज याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अरबाज खान याने शुरा हिच्यासाठी प्रेम व्यक्त केलं आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एवढंच नाही तर अरबाज खान याची बहीण अर्पीता हिने देखील पोस्टवर कमेंट करत शुरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र अरबाज याच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, शुरा हिच्यासोबत फोटो पोस्ट करत अरबाज याने प्रेम व्यक्त केल्यामुळे अभिनेत्याला ट्रोल देखील केलं जात आहे. ‘मलायका देखील असंच बोलला असशील…’ अशा कमेंट करत चाहते अरबाज याला ट्रोल करत आहेत… अरबाज याने दुसरं लग्न केल्यानंतर देखील अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला..

अरबाज खान आणि मलायका अरोरा

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या मुलाचं नाव अरहान खान असं आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.