Arbaaz Khan: दुसऱ्या बायकोच्या लेकीसोबत अरबाज खान, शूरा खान 8 वर्षाच्या मुलीची आई!
Arbaaz Khan second wife: 'अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानची लेक...', अरबाज खानला चिमुकल्या मुलीसोबत पाहिल्यानंतर चर्चांना उधाण, अरबाजची दुसरी बायको आणि 8 वर्षाच्या मुलीची आई!, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का...

अभिनेता अरबाज खान याने गेल्या महिन्यात मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर अनेकदा दोघांना एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आता देखील अरबाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ शूरा खान हिच्यासोबत नाही तर, एका चिमुकल्या मुलीसोबत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत अनेक प्रश्न विचारत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज खान लहान मुलीचा हात धरुन चालताना दिसत आहे. समोर शूरा खान उभी आहे. शूरा दिसल्यानंतर अरबाज मुलीला शूराकडे देतो. त्यानंतर शूरा मुलीला कारमध्ये बसवते. कारमध्ये आणखी एक महिला देखील दिसत आहे. त्यानंतर शूरा आणि अरबाज देखील एका गाडीत बसतात…
View this post on Instagram
व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांनी जोर धरला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘शूरा आणि तिच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अरबाज खानला देखील 22 वर्षांचा मुलगा आहे. शूराची मुलगी असेल तर काय फरक पडतो…’
अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अरबाज किती चांगला आहे… ‘, सांगायचं झालं तर, जेव्हा, अरबाज वयाच्या 56 व्या वर्षी लग्न करणार आहे, अशी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. लग्न फार मोठ्या प्रमाणात करता आलं नाही. तर काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
एका मुलाखतीत खुद्द अरबाज याने सांगितलं होतं की, त्याच्यामध्ये आणि शूरामध्ये 25 वर्षांचं अंतर आहे. रिपोर्टनुसार, शूराचं पहिलं लग्न झालं असून, तिला 8 वर्षांची मुलगी दोखील आहे. त्यामुळे खान कुटुंबियांनी सुरुवातील लग्नासाठी नकार दिला होता. पण अरबाज याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं.
कोण आहे शूराचा पहिला पती?
मिळालेल्या माहितीनुसार, शूरा खान हिचं पहिलं लग्न इंटेरियर डिझायनरसोबत झालं होतं. पण काही मतभेद असल्यामुळे दोघांचे कायम वाद व्हायचे. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शूराचं हे सत्या खान कुटुंबियांनी माहिती नव्हतं. त्यामुळे खान कुटुंबियांमध्ये नाराजी होती. पण शेवटी रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत… असं देखील अरबाज खान म्हणाला होता.
