सलमान खानच्या घरात लवकरच हालणार पाळणा; ईद पार्टीत मिळाली हिंट
सलमान खानच्या ईद पार्टीत अशी एक हिंट मिळाली आहे की, त्यावरून सलमान खानच्या घरी आता लवकरच पाळणा हालणार असल्याचं म्हटलं जात आहे. होय, नक्की काय आहे ही बातमी पाहुयात.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ईदच्या निमित्ताने शानदार पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या पार्टीला जवळपास सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण याच ईदच्या पार्टीत चाहत्यांना एक हिंटही मिळाली. ही हिंट म्हणजे सलमान खानच्या घरात लवकरच बाळाच्या रडण्याचा आवाज येईल असं दिसतंय. होय.
ईदच्या पार्टीत सलमान खानचा भाऊ अरबाज खान देखील त्याची पत्नी शूरा खानसह पार्टीत पोहोचला. पण दोघांनीही रेड कार्पेटवर एकत्र पोज दिली नाही. पण त्यावेळी अरबाज याने असं काही रिअॅक्शन दिले की त्यावरून सर्वजण असा अंदाज लावत आहेत की कदाचित शूरा गर्भवती आहे.
अरबाज खान-शुरा खान व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाला
अरबाज खान-शुरा खान व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता सलमान खान लवकरच काका होणार असून अरबाज खान बाब होणार आहे का? असा प्रश्न आता नेटकरी विचारू लागले आहेत. तसेच शूरा खानसोबत अरबाज याने कोणतीही पोज न देता तिला थेट आत पाठवलं.त्यानंतर अरबाज रेड कार्पेटवर मीडियासमोर पोज देण्यासाठी एकटाच आला. तसेच ईद पार्टीत शूराने तिच्या शरारा सूटखाली शूज घातले होते हे देखील तिच्या गरोदरपणाचे एक मोठी हिंट असल्याचं नेटकरी म्हणत आहे.
शूराच्या प्रेग्नेंटच्या बातम्या दररोज व्हायरल होत आहेत.
त्यामुळे अशा परिस्थितीत चाहते असा अंदाज लावत आहेत की शूरा गर्भवती आहे. तथापि, या जोडप्याने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अरबाजने डिसेंबर 2023 मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसऱ्यांदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे आणि शूराच्या प्रेग्नेंटच्या बातम्या दररोज व्हायरल होत आहेत. दरम्यान त्यातच आता हा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर शुराच्या गरोदरपणाच्या बातम्या पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होऊ लागल्या आहेत. दरम्यान पार्टीत अरबाज काळ्या रंगाच्या पठानी सूटमध्ये दिसला, तर शूरा शरारा सूटमध्ये दिसली.
View this post on Instagram
‘ती प्रेग्नेंट आहे, कारण ती प्रेग्नेंट महिलेसारखी चालत आहे.’
शूराला अशा प्रकारे कॅमेऱ्यांपासून दूर जाताना पाहून, तसेच त्यांच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘ती गर्भवती आहे का?” दुसऱ्याने लिहिले आहेत की, ‘ती प्रेग्नेंट आहे, कारण ती प्रेग्नेंट महिलेसारखी चालत आहे.’ तर एकाने लिहिलं आहे ‘ती पोटावर हात ठेवत आहे आणि फ्लॅट शूज देखील घातले आहे. ती गर्भवती आहे का?”
याआधीही शूराच्या गरोदरपणाच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर प्रेग्नन्सी किटसह अरबाज आणि शूराचा एआय फोटो व्हायरल झाला होता. आता हे जोडपे खरोखर पालक होणार आहे हे आता या दोघांनीच यावर भाष्य केल्यावर समोर येईल.