मलायकाच्या मुलासाठी सावत्र आईची खास पोस्ट; म्हणाली ‘माझा मित्र आणि माझं कुटुंब..’
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानच्या वाढदिवसानिमित्त शुरा खानने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. शुराच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शुरा ही अरहानची सावत्र आई आहे.
अभिनेता अरबाज खान आणि त्याची पूर्व पत्नी मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानने नुकताच आपला 22 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अरहानच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमैत्रिणींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच अरहानची सावत्र आई आणि अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानने सोशल मीडियावर त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. शुराच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शुराने अरहानला फ्रेंड आणि फॅमिली असं म्हटलंय. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर या दोघांमध्ये खूप चांगलं नातं असल्याचं स्पष्ट होतंय.
शुराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अरहानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अरहान गिटार वाजवताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर तिने लिहिलंय, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा आणि माझं कुटुंब अरहान. तू जसा आहेस तसाच राहिल्याबद्दल धन्यवाद.’ यासोबतच तिने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये शुराने अरहानला टॅग केलंय.
याआधी मलायका अरोरानेही मुलगा अरहानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अरहानच्या लहानपणीचे बरेच फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायका मिळून अरहानचं संगोपन करत आहेत. अरबाजने 24 डिसेंबर 2023 रोजी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. या लग्नात अरहानसुद्धा उपस्थित होता आणि त्याने सावत्र आईसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले होते.
या दोघांना त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोल केलं गेलं. इतकंच नव्हे तर शुरा ही अरबाजची पत्नी नव्हे तर मुलगी वाटते, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केलं होतं. एका मुलाखतीत अरबाज म्हणाला, “लोकांना याबद्दल आश्चर्य वाटू शकतं, पण लग्नापूर्वी आम्ही वर्षभरापेक्षा अधिक काळ एकमेकांना डेट केलंय. आम्ही आमच्या नात्याबद्दल ठाम होतो. आम्ही दोघं खूप नशीबवान होतो. आम्ही बाहेर कॉफी शॉपवर भेटायचो आणि जेव्हा मी तिला घरी घ्यायला किंवा सोडायचो जायचो, तेव्हा आम्हाला कोणीच पाहायचे नाही. कोणतेच पापाराझी तिचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करत नसल्याचा तिला खूप आनंद होता. आता आम्ही कॉफी शॉपवर जाण्याआधीच तिथे पापाराझी पोहोचलेले असतात.”