लग्नानंतर दीड महिन्यातच अरबाज खानच्या पत्नीसोबत घडली ‘ही’ घटना; चिड व्यक्त

अरबाज खानच्या दुसऱ्या निकाहला दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत, त्यातच त्याची पत्नी शुराला सोशल मीडियावर एक वाईट अनुभव आला आहे. याविषयी तिने पोस्ट लिहित चाहत्यांना माहिती दिली. शुराने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.

लग्नानंतर दीड महिन्यातच अरबाज खानच्या पत्नीसोबत घडली 'ही' घटना; चिड व्यक्त
सलमान खान, अरबाज खान, शुरा खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 11:34 AM

मुंबई : 14 फेब्रुवारी 2024 | अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. 24 डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला होता. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे. लग्नानंतर अरबाज आणि शुराला अनेकदा बाहेर फिरताना आणि इतर कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. सार्वजनिक ठिकाणी शुरा नेहमीच फोटोग्राफर्स किंवा पापाराझींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करते. कॅमेरासमोर ती कम्फर्टेबल नाही, हे सहज दिसून येतं. पण आता सोशल मीडियावर तिने एका घटनेवरून चिड व्यक्त केली आहे. याविषयी तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे.

13 फेब्रुवारी रोजी शुराने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित संताप व्यक्त केला. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाला होता. हा अनुभव अत्यंत चिड आणणारा होता, असं तिने लिहिलं आहे. यासोबतच तिने अकाऊंट रिकव्हर झाल्याचीही माहिती दिली आहे. अकाऊंट रिकव्हर करण्यात ज्यांनी शुराची मदत केली, त्यांचेही तिने आभार मानले आहेत. शुराने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘हॅलो मित्रमैत्रिणींनो, गेल्या आठवड्यात माझा इन्स्टाग्राम अकाऊंट कोणीतरी हॅक केला होता आणि हे फार संतापजनक होतं. मात्र फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या टीमने आणि माझी मैत्रीण शेली भुत्राने माझी मदत केली आणि अकाऊंट रिकव्हर केलं. या लोकांचे मी आभार मानते. इथे पुन्हा येऊन मला खूप चांगलं वाटतंय.’

शुराची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

शुरा खानचे इन्स्टाग्रामवर 13 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शुरा ही रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्टचं काम करते. याच कारणामुळे रवीना अरबाजच्या लग्नसोहळ्यात खास पाहुणी बनून पोहोचली होती. रवीनाने अरबाज आणि शुराच्या लग्नात खूप एंजॉय केलं होतं. अरबाज आणि शुराची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

56 वर्षीय अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2017 मध्ये दोघं विभक्त झाले. 1998 मध्ये अरबाज आणि मलायकाने लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. अरबाज आणि मलायाकाचा मुलगा अरहान खान हा आता 21 वर्षांचा आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.