AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निक्कीसोबत अरबाजच्या जवळीकला वैतागून गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय

‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये रितेश देशमुखनेही अरबाजला निक्कीवरून सुनावलं होतं. बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी लव्ह अँगलचा वापर करू नकोस, असं त्याने खडसावलं होतं. अरबाज हा रिॲलिटी शो स्टार आणि स्प्लिट्सविलाचा माजी स्पर्धक आहे.

निक्कीसोबत अरबाजच्या जवळीकला वैतागून गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय
अरबाज पटेल, निक्की तांबोळी, लीझा बिंद्राImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2024 | 2:49 PM
Share

‘बिग बॉस मराठी 5’च्या घरात अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा असते. निक्की आणि अरबाज यांच्यातील जवळीक पाहून सूत्रसंचालक रितेश देशमुखनेही त्यांना सुनावलं होतं. बिग बॉसच्या घराबाहेर अरबाजची गर्लफ्रेंड असूनही तो घरात निक्कीवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतोय, असं नेटकरी म्हणाले. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लीझा बिंद्रा ही अरबाजची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जातंय. लीझाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अरबाजसोबतचे अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ पहायला मिळतात. इतकंच नव्हे तर निक्कीसोबतच अरबाजची जवळीक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर कमेंट्स करायला सुरुवात केली तेव्हा तिने पोस्टसुद्धा लिहिली होती. या सर्व घडामोडींदरम्यान आता लीझाने मोठा निर्णय घेतला आहे.

लीझाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेल्फी पोस्ट करत लिहिलंय, ‘मी काही काळासाठी सोशल मीडिया सोडत आहे. लव्ह यू, हसत राहा.’ तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील अरबाजची वागणूक पाहून लीझाने ट्रोलिंगपासून स्वत:ला वाचवण्यासाठी असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. ‘तुझ्या भावना आम्ही समजू शकतो’, असं एका युजरने म्हटलंय. तर ‘अरबाज तुझ्या प्रेमाच्या लायक नाही’, असं दुसऱ्याने लिहिलंय.

View this post on Instagram

A post shared by leeza bindra (@leezabindra)

लीझाने याआधीही इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली होती. ‘आपण कधीच कोणाविषयी वाईट बोलू नये. कारण त्या व्यक्तीची अडचण काय, हे आपल्याला माहीत नाही. ती व्यक्ती अशी का वागते, कशासाठी वागतेय, त्यामागे कारण काय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे तुम्ही हे सर्व तुमच्या देवावर सोडून द्या. देव सर्वकाही पाहतोय आणि तोच योग्य निर्णय घेईल. कोणाबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. हे जग देवाचं आहे आणि तोच सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे ओळखतो. माझं भविष्य काय हे मलाही माहीत नाही. पण माझ्या देवाला सगळं माहीत आहे. त्यामुळे मी जेव्हा त्यांच्यावरच सगळं सोडून दिलंय, तर तुम्हीसुद्धा सर्वकाही सोडून द्या’, असं तिने त्यात म्हटलं होतं. लीझाची ही पोस्ट अप्रत्यक्षपणे अरबाज आणि निक्कीविषयीच होती, असं नेटकरी म्हणत आहेत.

याआधीही लीझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, ‘मित्रमैत्रिणींनो.. कृपा करून अरबाजच्या बाबतीत मला मेसेज किंवा कमेंट करू नका.’ बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्की यांच्यातील जवळीक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लीझाला टॅग करण्यास सुरुवात केली होती. त्यालाच वैतागून लीझाने अशी पोस्ट लिहिली होती.

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...