Love Life | जेव्हा अर्चना पूरन सिंग – अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपमुळे बसला होता सर्वांना आश्चर्याचा धक्का

Archana Puran Singh | अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग एकेकाळी होते रिलेशनशिपमध्ये? सत्य समोर आल्यानंतर सर्वांना बसला आश्चर्याचा धक्का... सध्या सर्वत्र बिग बी आणि अर्चना यांच्या नात्याच्या चर्चा.... अनेक वर्षांनंतर पुन्हा का रंगतीये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांच्या नात्याची चर्चा...

Love Life | जेव्हा अर्चना पूरन सिंग - अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपमुळे बसला होता सर्वांना आश्चर्याचा धक्का
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 1:11 PM

मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री अर्चना पूरन सिंग (Archana Puran Singh) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अर्चना हिने १९८७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अर्चना हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. वयाच्या ६१ व्या वर्षी देखील अर्चना झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. तिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अर्चना तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अर्चना आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या…

१९९० मध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा एका मॅगझीनमध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांचा एक फोटो आला होता. फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग रोमाँटिक पोज देताना दिसले होते.

मॅगझीनमध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांचा खास फोटो पोस्ट करत दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं लिहिण्यात आलं होतं. ही गोष्ट समोर आल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी बिग बी यांना सत्य काय आहे? विचारण्याचा प्रयत्न केला. पण बिग बी यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही…

हे सुद्धा वाचा

पण सर्वत्र चर्चांना उधाण आल्यानंतर मॅगझीनने एप्रिल फूलच्या दिवसांमध्ये एक प्रँक केल्याचं समोर आलं. या गोष्टीची कल्पना अमिताभ बच्चन यांना होती. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटोमध्ये अर्चना हिच्यासोबत दिसणारे बिग बी नव्हते तर, अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट होते. पण तेव्हा अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांच्या नात्यामुळे चर्चांना उधान आलं होतं.

दरम्यान, आज अर्चना हिचा वाढदिवस असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘दे दना दन’, ‘राजा हिंदुस्तानी’, आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज देखील अभिनेत्री झगमगत्या विश्वात सक्रिय आहे.

अर्चना पूरन सिंग सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अर्चना चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.