Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Malaika | अर्जुन कपूरच्या या पोस्टनंतर मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांना उधाण; मित्राने सांगितलं सत्य

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर दोघांच्या जवळच्या मित्राने प्रतिक्रिया दिली आहे.

Arjun Malaika | अर्जुन कपूरच्या या पोस्टनंतर मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांना उधाण; मित्राने सांगितलं सत्य
Malaika and ArjunImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:18 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना बॉलिवूडमधील पॉवर कपल मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन आणि मलायकाने त्यांचं नातं लपवलं नाही. तर नेहमीच ते दोघं त्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. वेकेशनपासून सेलिब्रेशन पर्यंत खास क्षणी हे दोघं एकमेकांसोबत दिसतात. मात्र नुकतंच अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. अर्जुन कपूरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली. या चर्चांवर आता या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटाच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसला. मात्र त्याच्या या फोटोंवर कुठेच मलायकाची प्रतिक्रिया दिसली नाही. तर दुसरीकडे मलायकासुद्धा एकटीच मुंबईत आयोजित केलेल्या प्रसिद्ध ए. पी. ढील्लनच्या पार्टीला पोहोचली होती. प्रत्येक वेळी एकत्र दिसणारं हे कपल आता वेगळे का झाले, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याच कारणामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आहे.

हे सुद्धा वाचा

या चर्चांवर आता दोघांच्या एका मित्राने प्रतिक्रिया दिली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “अर्जुन आणि मलायका हे दोघं त्यांच्या ब्रेकअपविषयीच्या चर्चा पाहून हसत आहेत. अशा प्रकारच्या चर्चांवर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न त्यांना पडला आहे. लोक कसलाच विचार न करता अशा गोष्टींवर चर्चा करू लागतात. म्हणूनच त्यावर काहीच उत्तर न देणं ठीक आहे, असं दोघांचं मत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन आणि मलायका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये या दोघांनी आपलं रिलेशनशिप ‘ऑफिशिअल’ केलं होतं. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघं एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात. मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं.

अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या दोघांच्या वयातील अंतरामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली तर कधी टीका केली. आपल्या शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना मलायका ट्रोलर्सना उपरोधिक उत्तर दिलं होतं. “दुर्दैवाने मी फक्त वयाने मोठी नाही तर माझ्यापेक्षा छोट्या व्यक्तीला डेट करतेय. माझ्यात हिंमत आहे. मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतेय, बरोबर बोलली ना? मी सर्वांना सांगू इच्छिते की मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीये”, असं ती म्हणाली होती.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.