अर्जुन कपूरची बहीण अंशुलाचा ‘मिस्ट्री मॅन’ आहे तरी कोण? दोघांचे फोटो व्हायरल

कोण आहे मिस्ट्री मॅन रोहन? ज्याला अर्जुन कपूरची बहीण अंशुला करतेय डेट

अर्जुन कपूरची बहीण अंशुलाचा 'मिस्ट्री मॅन' आहे तरी कोण? दोघांचे फोटो व्हायरल
अर्जुन कपूरची बहीण अंशुलाचा 'मिस्ट्री मॅन' आहे तरी कोण? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 10:42 AM

मुंबई: अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होतो. मलायका अरोरासोबतचं त्याचं नातं जगजाहीर आहे. याचसोबत तो वारंवार सोशल मीडियाद्वारे बहीण अंशुला कपूर हिच्यावरही कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव करत असतो. सध्या अंशुला तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर मिस्ट्री मॅनसोबताचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यानंतर तिच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी चर्चा होऊ लागली आहे.

कोणाला डेट करतेय अंशुला?

या व्हायरल व्हिडीओमध्ये अंशुला कपूर ही रोहन ठक्करसोबत पहायला मिळतेय. व्हेकेशनदरम्यानचा हा दोघांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत ती रोहनसोबत अत्यंत आनंदी असल्याचं दिसतंय. रोहनच्या वाढदिवसानिमित्त तिने हा व्हिडीओ पोस्ट केला होता आणि तो तिचा सर्वांत ‘फेव्हरेट बॉय’ असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

अंशुलाच्या या व्हिडीओवर मलायका अरोरा, महीप कपूर आणि संजय कपूर यांनीसुद्धा कमेंट करत रोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अंशुला आणि रोहन एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

कोण आहे मिस्ट्री मॅन रोहन ठक्कर?

अंशुलाचा हा ‘फेव्हरेट बॉय’ रोहन ठक्कर आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहन हा स्क्रीनरायटर आहे. त्याने अद्याप बॉलिवूडमध्ये काम केलं नाही, मात्र इतर भाषांमधील प्रोजेक्ट्सवर त्याने स्क्रीनरायटर म्हणून काम केलं आहे. अंशुलाने याआधीही तिच्या इन्स्टाग्रामवर रोहनसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

अंशुला आणि रोहन या वर्षाच्या सुरुवातीपासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. अंशुलाच्या कुटुंबीयांनाही या रिलेशनशिपबद्दल कल्पना आहे. अंशुला ही बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना शौरी कपूर यांची मुलगी आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.