अर्शद वारसीने पॉर्नशी केली रणबीरच्या ‘ॲनिमल’ची तुलना; म्हणाला..

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटाचा काहींनी विरोध केला तर काहींनी त्याकडे फक्त मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पाहिलं. अभिनेता अर्शद वारसीने या चित्रपटाविषयी आपलं मत मांडलं आहे. यावेळी त्याने 'ॲनिमल'ची तुलना अडल्ट फिल्मशी केली. अर्शद नेमकं काय म्हणाला, ते पाहुयात..

अर्शद वारसीने पॉर्नशी केली रणबीरच्या 'ॲनिमल'ची तुलना; म्हणाला..
Arshad Warsi and Ranbir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 10:53 AM

मुंबई : 20 डिसेंबर 2023 | रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाविषयी विविध मतमतांतरे पहायला मिळाली. आता अभिनेता अर्शद वारसी ‘ॲनिमल’ या चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. या चित्रपटात रणबीरसोबतच रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका आहेत. ‘ॲनिमल’सारख्या चित्रपटात काम करण्याविषयी अर्शदने आपलं मत मांडलं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला काहींनी विरोध केला तर काहींनी त्याकडे फक्त एक चित्रपट म्हणून बघण्याचा सल्ला दिला. यामधील न्यूड आणि इंटिमेट सीन्स, डायलॉग्स सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले.

‘ॲनिमल’ का आवडला?

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अर्शद म्हणाला, “कदाचित सर्व गंभीर कलाकारांना ‘ॲनिमल’ हा चित्रपट आवडणार नाही, पण मला तो चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट म्हणजे जणू ‘किल बिल’चा पुरुषी व्हर्जन होता. माझा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. मी चित्रपटांकडे फक्त मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पाहतो. त्यामुळे जेव्हा मी थिएटरमध्ये जातो, तेव्हा मला असेच चित्रपट पहायला आवडतात. मला अधिक विचार करायचा नाही, मला काही शिकवू नका किंवा ज्ञान देऊ नका. हे सर्व मी शाळेत शिकलोच आहे. चित्रपट फक्त मनोरंजनाचा विषय आहे.”

हे सुद्धा वाचा

‘ॲनिमल’सारख्या चित्रपटात का काम करणार नाही?

‘ॲनिमल’चं कौतुक करतानाच अर्शदने हेसुद्धा स्पष्ट केलं की तो अशा चित्रपटांमध्ये काम करणार नाही. “अशा काही गोष्टी असतात, ज्या आपल्याला बघायला आवडतात पण करायला नाही. ‘ॲनिमल’सुद्धा माझ्यासाठी असाच चित्रपट आहे. जेव्हा इंद्र कुमार यांनी मला ‘ग्रँड मस्ती’सारखा चित्रपट करण्यासाठी कॉल केला होता, तेव्हा मी नकार दिला. कारण मला असे चित्रपट करायला आवडत नाहीत. मला सेक्स कॉमेडी आवडत नाही. याचा अर्थ असा नाही की ते मला पहायलाही आवडत नाही. ते मनोरंजक असतात, पण मला त्यात काम करायला आवडत नाही. एक प्रेक्षक म्हणून मला असे चित्रपट पहायला आवडतील. पण एक अभिनेता म्हणून मी त्यात काम करू शकत नाही. मला पॉर्न बघायला आवडतं, पण मी पॉर्न करू शकत नाही”, असं त्याने स्पष्ट केलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.