AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 Promo | बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अर्शी खानचा ड्रामा!

'बिग बॉस 14'  (Bigg Boss 14) चा आजचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा अर्शी खान ड्रामा करताना दिसत आहे.

Bigg Boss 14 Promo | बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अर्शी खानचा ड्रामा!
| Updated on: Dec 29, 2020 | 6:53 PM
Share

 मुंबई : ‘बिग बॉस 14’  (Bigg Boss 14) चा आजचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा अर्शी खान ड्रामा करताना दिसत आहे. कलर्स टीव्हीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे त्यामध्ये अर्शी, राहुल वैद्यला ‘नल्ला नल्ला’ बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे जास्मीन आणि राखी सावंतमध्ये भांडणे होताना दिसत आहे. राहुल आणि अर्शी किचनमध्ये असतात त्यावेळी अर्शी राहुलला चिडवताना दिसत आहे. (Arshi Khan’s drama in the house of Bigg Boss)

ति राहुलला भगोडा म्हणताना दिसत आहे. यावेळी राहुलही तिच्या शरिरावर टिपणी करतो. यानंतर अर्शी बिग बॉसला म्हणताना दिसत आहे की, याने माझ्या शरीरावर टिपणी केली आहे. आणि अर्शी जोरजोरात ओरडताना दिसणार आहे.

रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघे नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार होते, असा धक्कादायक खुलासा रुबीनाने होता. ही गोष्ट रुबीनाने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर शेअर केली होती. आणि रूबीना सांगते की, मी आणि अभिनवने ऐकमेकांना नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला होता आणि हेच कारण होते की आम्ही बिग बॉसमध्ये आलो होतो. हे सर्व सांगताना रूबीना रडताना दिसली होती.

‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपआपली रहस्ये उघड केली होती.  एकता कपूरने ‘इम्युनिटी स्टोन’ रूबीनाला दिला होता. ज्याच्या सहाय्याने रूबीना एकदा नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहु शकत होती. परंतु रुबीनाने अद्याप इम्युनिटी स्टोन वापरला नाही. काल बिग बॉसने रुबीनाला इम्युनिटी स्टोनचा वापर करण्याविषयी विचारले होते. मात्र, तिने इम्युनिटी स्टोन वापरण्यास नकार दिला होता.

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानचा मोठा धमाका, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चा महाअंतिम सोहळा

Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील ‘व्हिलन’ ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

(Arshi Khan’s drama in the house of Bigg Boss)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.