Aryan Khan drug case : आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला नवं वळण, सरकारी वकिलानं दिला राजीनामा
अद्वैत सेठना यांना एनसीबीनं 2020 विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली होती. क्रूज शिप ड्रग्स प्रकरणी ते मुख्य सरकारी वकील आहेत. आर्यन खानविरोधात ऑक्टोबरमध्ये तक्रार करण्यात आली होती. आर्यनला नंतर एनसीबीनं विशेष तपास पथकानं क्लीन चीट दिली.
मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूजमधील ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खानच्या विरोधात सत्र न्यायालयात (Sessions Court) अॅडव्होकेट अद्वैत सेठना (Advait Sethna) यांनी एनसीबीचं प्रतिनिधीत्व केलं होतं. एनसीबीच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीनचीट देण्यात आली. अद्वैत सेठना यांचा राजीनामा (Resignation of Advocate) एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, एनसीबीचे महानिदेशक राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेतील. अद्वैत सेठना यांनी विशेष कोर्टाला सांगितलं की, आरोग्य चांगलं राहत नसल्यानं ते एनसीबीच्या वकिलीचा ते राजीनामा देत आहेत. एनसीबी पुढील कारवाईसाठी निर्णय घेईल. परंतु, राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना या प्रकरणी काम पाहावं लागेल.
2020 ला झाली होती निवड
अद्वैत सेठना यांना एनसीबीनं 2020 विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली होती. क्रूज शिप ड्रग्स प्रकरणी ते मुख्य सरकारी वकील आहेत. आर्यन खानविरोधात ऑक्टोबरमध्ये तक्रार करण्यात आली होती. आर्यनला नंतर एनसीबीनं विशेष तपास पथकानं क्लीन चीट दिली.
14 जणांना देण्यात आली क्लीनचीट
आरोपींकडून जामिनाच्या याचिकेवर निर्णय घेण्यात आला नव्हता. 3 ऑक्टोबरला आर्यनच्या पहिल्या कोठडीदरम्यान एनसीबीकडून वकील म्हणून अद्वैत सेठना काम पाहत आहेत. एनसीबीनं एकूण 20 जणांना अटक केली होती. एसआयटीनं मे महिन्यात आर्यन खानला क्लीनचीट दिली होती. मादक पदार्थ सापडल्याने दोन आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत.