Shah Rukh Khan | वडील मुस्लिम, आई हिंदू… कोणता धर्म मानतो आर्यन खान? लेकाच्या धर्माबद्दल गौरीकडून मोठा खुलासा

कोणता धर्म मानतो शाहरुख खान याचा लेक आर्यन खान? मुलाच्या धर्माबद्दल गौरी खान हिच्याकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र आर्यन खान आणि शाहरुख खान याची चर्चा...

Shah Rukh Khan | वडील मुस्लिम, आई हिंदू... कोणता धर्म मानतो आर्यन खान? लेकाच्या धर्माबद्दल गौरीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 1:00 PM

मुंबई : ड्रग्न प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान पुन्हा चर्चेत आला आहे. आर्यन खान याच्या अटकेनंतर समीर वानखेडे आणि शाहरुख खान सातत्याने संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण आता समोर आलं आहे. या संभाषणात शाहरुख खानने मुलाला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांच्याकडे विनंती केल्याचं समोर आलं. सध्या सर्वत्र आर्यन खान आणि शाहरुख खान याच्याबद्दल चर्चा रंगत आहे. कोणत्याही कार्यक्रमात किंग खान त्याच्या मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. फक्त शाहरुख खान नाही तर अभिनेत्याची पत्नी गौरी खान देखील आर्यन आणि सुहाना खान यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते.

एक मुलाखतीत गौरी खान हिली आर्यन खान कोणता धर्म मानतो याबद्दल विचारण्यात आलं होतं. सांगायचं झालं तर शाहरुख खान मुस्लिम आहे तर, गौरी खान हिंदू आहे.. यावर एका मुलाखतीत गौरी म्हणाली होती, ‘मन्नतमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळी, होळी, ईद.. प्रत्येक सणाचा आनंद आम्ही घेतो…’

पुढे गौरी म्हणाली, ‘आर्यन त्याच्या वडिलांच्या फार जवळ आहे. शिवाय तो वडिलांना फॉलो करतो आणि आर्यन स्वतःला मुसलमान मानतो…’ पुढे गौरीला लग्नानंतर धर्मांतर का केले नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता, यावर गौरी म्हणाली, ‘मी शाहरुखवर प्रचंड प्रेम करते. त्याचा आदर, सन्मान करते. याचा अर्थ असा होत नाही की मी माझा धर्म बदलू… ही गोष्ट तर शाहरुखवर पण लागू होते…’

हे सुद्धा वाचा

जेव्हा सुहानाने शाहरुख खान याला धर्म विचारला…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखची मुलगी सुहाना लहान असताना तिला शाळेत फॉर्म भरण्यास सांगितलं होतं, या फॉर्ममध्ये एका ठिकाणी तिला तिचा धर्म विचारण्यात आला होता… तेव्हा सुहानाने वडिलांना धर्म विचारला, तेव्हा किंग खान म्हणाला, ‘आपण भारतीय आहोत, आपला कोणताही धर्म नाही…’ शाहरुख कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

आर्यन खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आर्यन याने नुकताच स्वतःचा क्लोदिंग ब्रॉन्ड सुरु केला आहे. शिवाय आर्यन याला अभिनयात आवड नसून तो पडद्यामागे राहून काम करणार आहे. तर दुसरीकडे किंग खान याची मुलगी सुहाना खान हिला मात्र अभिनयाची आवड आहे. सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिज’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाय ठेवणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.