Bigg Boss 17 : आर्यन खानची वकील सना रईस खानला ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणं महागात

'बिग बॉस 17'मध्ये सहभागी झालेल्या 17 स्पर्धकांमध्ये आर्यन खानच्या वकिलाचाही समावेश आहे. वकील सना रईस खान ही बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. मात्र यामुळे तिच्यासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. नेमकं काय घडलंय, ते जाणून घेऊयात..

Bigg Boss 17 : आर्यन खानची वकील सना रईस खानला 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणं महागात
Sana Raees Khan and Aryan KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 3:39 PM

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : बिग बॉसच्या सतराव्या सिझनची अत्यंत धमाकेदार सुरुवात झाली. दर सिझनप्रमाणे यंदाही त्यातील स्पर्धक विविध कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सलमान खानने या शोमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक निवडून आणले आहेत. हे स्पर्धक वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनची वकील असलेल्या सना रईस खानचाही समावेश आहे. ड्रग्ज प्रकरणात सना ही आर्यन खानची वकील होती. मात्र तिला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणं चांगलंच महागात पडलं आहे. सनावर ‘बार काऊन्सिल ऑफ इंडिया’च्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वकील आशुतोष यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी सना रईस खानच्या ‘बिग बॉस’मधील सहभागावरून आक्षेप नोंदवला आहे. ‘मी बार काऊन्सिल ऑफ इंडियाला याबद्दलची माहिती दिली आहे की सना रईस खानने नियमांच्या विरोधात जाऊन बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे’, असं त्यांनी लिहिलं आहे. यासोबतच त्यांनी असंही लिहिलं आहे की ‘बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या नियम 47 ते 52 अंतर्गत, कोणताही वकील दुसऱ्या पद्धतीने कमाई करू शकत नाही. इतकंच नाही तर 1961 च्या सेक्शन 49 (1) (c) अंतर्गत, जो वकील प्रॅक्टीस करत असेल, त्याला इतर दुसऱ्या क्षेत्रात पूर्ण वेळ नोकरी करण्यात प्रतिबंध आहे.’

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सना ही मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारी क्रिमिनल ॲड्वोकेट आहे. तिने अनेक हाय-प्रोफाइल केसेसमध्ये आरोपींचं प्रतिनिधित्व केलं आहे. सनाने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आरोपी अवीन साहूचं प्रतिनिधित्व केलं होतं. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. याशिवाय शिना बोरा हत्येप्रकरणात सनाने मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं प्रतिनिधित्व केलं होतं. काही रिपोर्ट्सनुसार तिने हिंदू गोवंश रक्षा समिती आणि सनातन संस्थेचे सदस्य वैभव राऊत यांचंही प्रतिनिधित्व केलं होतं. 2018 च्या नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात ते आरोपी होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.