AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसले यांच्या नातीचा भन्नाट डान्स, पाहताच चाहते म्हणाले, ‘पुढची सुपरस्टार…’

Asha Bhosle Granddaughter | आशा भोसले यांच्या नातीपुढे माधुरी दीक्षित - ऐश्वर्या राय देखील फेल, जनाई भोसले हिचा डान्स पाहून चाहते अवाक्, व्हिडीओ व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशा भोसले यांच्या नातीची चर्चा...

आशा भोसले यांच्या नातीचा भन्नाट डान्स, पाहताच चाहते म्हणाले, 'पुढची सुपरस्टार...'
| Updated on: Feb 17, 2024 | 8:22 AM
Share

मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या काळात अनेक हीट गाणी गायली आहे. आज देखील चाहते आशा भोसले यांचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतात. जेव्हा आशा भोसले गाणं गातात, तेव्हा त्यांच्या गाण्यांवर अनेक चाहते नाचू लागतात. सांगायचं झालं तर, आशा भोसले यांचं कुटुंब लाईमलाईटमध्ये नसतं. पण आशा भोसले यांची नात जनाई भोसले कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. जनाई हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जनाई डान्स करताना दिसत आहे.

जनाई हिचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. जनाई हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण तिच्या समोर अनेक प्रसिद्ध अभिनेत्री फेल आहेत. व्हिडीओमध्ये जनाई ‘डोला रे डोला’ गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहे. आशा भोसले यांच्या नातीपुढे माधुरी दीक्षित – ऐश्वर्या राय देखील फेल आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जनाई भोसले हिची चर्चा रंगली आहे.

जनाई हिचा डान्स व्हिडीओ आशा भोसले यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानचा आहे. जनाई पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. जनाई हिच्या व्हायरल व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘पुढची सुपरस्टार’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही प्रचंड सुंदर आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘माधुरी हिच्सायासाठी कांटे की टक्कर..’

जनाई भोसले लोकप्रिय अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जनाई हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. विविध कार्यक्रमांमध्ये ती आजी आशा भोसले यांच्यासोबत उपस्थित असते. जनाई ही 20 वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्याचसोबत उद्योजिकासुद्धा आहे.

जनाई तिच्या सौंदर्यासोबतच गायनामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील जनाई कायम सक्रिय असते. जनाई हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जनाई कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.  चाहते देखील जनाई हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.