72 Hoorain : ‘तुमने जो जिहाद का रास्ता चुना है, वो रास्ता तुम्हे…’, सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर निर्मात्यांनी उचललं मोठं पाऊल

सत्य घटनांवर आधारित '72 हूरें' सिनेमाच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांचं रहस्य येणार समोर? सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर निर्मात्यांनी उचललं मोठं पाऊल

72 Hoorain : 'तुमने जो जिहाद का रास्ता चुना है, वो रास्ता तुम्हे...', सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर निर्मात्यांनी उचललं मोठं पाऊल
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 2:44 PM

मुंबई | ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर ’72 हूरें’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेन्सॉर बोर्डाने बंदी घातल्यानंतर देखील सिनेमाच्या निर्मात्यांनी ’72 हूरें’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन नॅशनल पुरस्कार विजेते संजय पुरण सिंग यांनी केलं आहे. निर्मात्यांनी ’72 हूरें’ सिनेमाचा ट्रेलर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC ला पास करण्यासाठी पाठवला होता. पण सेन्सॉर बोर्डाने ट्रेलरला आक्षेपार्ह ठरवत बदल करण्याचा सल्ला दिला आणि तूर्तास त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. असं असताना देखील सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा सुरु आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. मात्र, सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीशिवाय सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करता येणार नाही… अशी चर्चा रंगत आहे.

सेन्सॉर बोर्डाकडून सिनेमाच्या ट्रेलरला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे सिनेमाचे निर्माते अशोक पंडित यांनी एक पत्रकार परिषद घेत सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी अशोक पंडित म्हणाले, ‘ ’72 हूरें’ सिनेमाचं सेन्सॉर प्रमाणपत्र आमच्याकडे आहे. ट्रेलरमध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये तुटलेला पाय दाखवण्यात आला आहे… त्या सीनवर कात्री फिरवण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. पण सिनेमाला आधिच सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे अशोक पंडित म्हणाले, ‘ सेन्सॉर बोर्डाने सीनेमात सीन असताना देखील ट्रेलरमधील कुराणच्या एका शब्दावर आक्षेप घेतला आहे. सिनेमात जे सीन योग्य वाटले, ते ट्रेलरमधून का हटवण्यास सांगत आहेत. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, असं असताना सिनेमा पुरस्कार खोटा आहे का? असा प्रश्न देखील निर्मात्यांनी उपस्थित केला आहे.

’72 हूरें’ सिनेमा ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचं देखील सांगितलं आहे. त्यांच्या ट्विटवर अनेक जण कमेंट आणि लाईक्स करत प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ’72 हूरें’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ’72 हूरें’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर यांच्या खांद्यावर आहे. पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.