Asia Cup 2023 | 6 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर श्रद्धा कपूर नाराज; फायनल मॅचनंतर अभिनेत्रीकडून सवाल
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर सध्या बॉलर मोहम्मद सिराजचीच जोरदार चर्चा आहे. एकीकडे सर्वांकडून सिराजचं कौतुक होत असताना अभिनेत्री श्रद्धा कपूर मात्र त्याच्यावर नाराज आहे.
मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजचं नाव तुफान चर्चेत आहे. प्रत्येक जण त्याच्या बॉलिंगचं तोंडभरून कौतुक करत आहे. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींपासून ते बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत त्याच्या बॉलिंगचे चाहते झाले आहेत. एकीकडे मोहम्मद सिराजची सोशल मीडियावर प्रशंसा होत असताना दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने मात्र त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मॅच संपल्यानंतर श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सिराजसाठी एक पोस्ट लिहिली आहे. श्रद्धाच्या या पोस्टवरून ती सिराजवर नाराज असल्याचं दिसून येत आहे.
भारताचा वेगवान बॉलर मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या बॅट्समनना मैदानावर टिकूच दिलं नाही. श्रीलंकेचा संघ अवघ्या 15.2 षटकात 50 धावातच गारद झाला. त्यानंतर भारताने 51 धावा करत विजय साकारला. 2018 च्या आशिया चषकाच्या विजयानंतर भारताचंही पहिलं विजेतेपद आहे. सिराजने श्रीलंकन बॅट्समनना खेळपट्टीवर स्थिरावूच दिलं नाही. आपल्या आक्रमक बॉलिंगच्या जोरावर एकाच ओवरमध्ये चार विकेट्स घेणारा सिराज हा वनडे इतिहासातील चौथा बॉलर ठरला आहे.
भारताच्या या विजयावर सर्वजण खुश आहेत आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अडीच तास चाललेल्या या मॅचमध्ये मोहम्मद सिराजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. श्रद्धा कपूरने मात्र तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट लिहित सिराजवर नाराजी व्यक्त केली. सिराजमुळे रविवारचा दिवस वाया गेला असं तिने अप्रत्यक्षपणे म्हटलंय. कारण भारताविरुद्ध श्रीलंकेचा हा सामना अवघ्या अडीच तासातच संपला.
श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘आता सिराजलाच विचारा की या मोकळ्या वेळेत काय करावं?’ श्रद्धाचा रविवारचा प्लॅन हा रात्री उशिरापर्यंत मॅच पाहण्याचा होता. मात्र 51 धावांचंच लक्ष असल्याने अडीच तासात मॅच संपली. त्यामुळे उरलेल्या वेळेचा काय करावा असा प्रश्न श्रद्धाला पडला. म्हणूनच श्रद्धाने सिराजसाठी ही पोस्ट लिहिली.
सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी मोहम्मद सिराजसाठी पोस्ट लिहिली आणि त्याचं कौतुक केलं. RRR चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली, साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांनीसुद्धा सिराजसाठी विशेष पोस्ट लिहिली.