Bigg Boss | स्क्रिप्टेड शो ते तोडकंमोडकं मानधन; असिम रियाजचे इंडस्ट्रीवर मोठे आरोप

इतकंच नव्हे तर बिग बॉसचा तेरावा सिझन मी जिंकावा अशी निर्मात्यांची इच्छा नव्हती, असेही आरोप असिमने केले आहेत. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये निर्मात्यांनी मुद्दाम लाइव्ह वोटिंग सुरू केली आणि त्यामुळेच सिद्धार्थ ट्रॉफी जिंकला, असं तो म्हणाला.

Bigg Boss | स्क्रिप्टेड शो ते तोडकंमोडकं मानधन; असिम रियाजचे इंडस्ट्रीवर मोठे आरोप
Asim RiazImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 9:30 AM

मुंबई : ‘बिग बॉस 13’ फेम मॉडेल असिम रियाज सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या मुलाखतीत असिमने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, बिग बॉसचे निर्माते आणि एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीच्या वागणुकीबाबत बरेच खुलासे केले. बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड असतो, असं त्याने म्हटलंय. इतकंच नव्हे तर बिग बॉसचा तेरावा सिझन मी जिंकावा अशी निर्मात्यांची इच्छा नव्हती, असेही आरोप असिमने केले आहेत. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये निर्मात्यांनी मुद्दाम लाइव्ह वोटिंग सुरू केली आणि त्यामुळेच सिद्धार्थ ट्रॉफी जिंकला, असं तो म्हणाला.

या मुलाखतीत असिमने इंडस्स्ट्रीत मिळालेल्या वागणुकीबाबतही नाराजी व्यक्त केली. “मला बरेच मोठे ऑफर्स मिळाले होते. वर्कशॉपलाही बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी मला खूप कमी मानधन मिळालं. जर कोणी सुपरस्टार असता तर त्याला कोट्यवधी रुपये दिले असते. मात्र मला नेहमीच एखाद्या प्रोजेक्टसाठी कमी पैसे मिळतात. बजेट कमी असल्याचं कारण सांगितलं जातं. जर मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी इतकी मेहनत केली आहे तर मग मी कमी पैशांत का काम करावं”, असा सवाल असिमने केला.

बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये असिम आणि सिद्धार्थ शुक्लाची मैत्री झाली होती. विजेतेपदासाठी या दोघांमध्ये चुरस रंगली होती. मात्र ग्रँड फिनालेमध्ये सिद्धार्थने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सिद्धार्थ आणि असिम आपापल्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र झाले.

हे सुद्धा वाचा

“निधनापूर्वी स्वप्नात आला होता सिद्धार्थ शुक्ला”

या मुलाखतीत असिमने असंही सांगितलं की निधनापूर्वी सिद्धार्थ त्याच्या स्वप्नात आला होता. “सिद्धार्थ माझ्या स्वप्नात आला होता. मी माझी आई आणि भावाची शपथ घेऊन सांगतोय. त्याला स्वप्नात पाहिल्यानंतर काही वेळाने मला फोन आला की तो या जगात नाही. बिग बॉसच्या घरात मी सिद्धार्थसोबत बराच वेळ घालवला होता. त्याच्यासोबत माझी चांगली मैत्री झाली होती”, असं तो म्हणाला.

असिम रियाजला बिग बॉसमुळे घराघरात प्रसिद्धी मिळाली. जॉन सीना या हॉलिवूड स्टारनेही त्याचं समर्थन केलं होतं. मात्र तो विजेता ठरला नाही. बिग बॉस 13 मधून बाहेर पडल्यानंतर तो बऱ्याच म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला. त्याचा भाऊ उमर रियाज बिग बॉस 15 मध्ये दिसला होता. आता एकता कपूरचा शो ‘लॉक अप सिझन 2’साठी त्याचं नाव समोर येत आहे.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.