धार्मिक कारण देत ‘बिग बॉस’च्या लोकप्रिय जोडीने केला ब्रेकअप; नेटकरी म्हणाले ‘फ्रिज, ब्रीफकेसपासून वाचलीस’

बिग बॉसच्या घरात असताना दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. घरातून बाहेर पडल्यानंतरही दोघांनी बऱ्याच रोमँटिक गाण्यांच्या अल्बममध्ये एकत्र काम केलं होतं. आता धर्माचं कारण देत दोघांनी ब्रेकअप केल्याचा खुलासा केला आहे. त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

धार्मिक कारण देत 'बिग बॉस'च्या लोकप्रिय जोडीने केला ब्रेकअप; नेटकरी म्हणाले 'फ्रिज, ब्रीफकेसपासून वाचलीस'
Himanshi Khurana and Asim RiazImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 2:49 PM

मुंबई : 8 डिसेंबर 2023 | प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हिमांशी खुरानाने ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता असिम रियाझशी ब्रेकअप केल्याचा खुलासा केला. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ही लोकप्रिय जोडी वेगळी झाली. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. धार्मिक श्रद्धेसाठी प्रेमाचा त्याग केल्याचं स्पष्टीकरण असिमने दिलं आहे. हिमांशीने सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून ब्रेकअपची माहिती दिली होती. ‘होय, आम्ही आता सोबत नाही आहोत. आम्ही एकमेकांसोबत जो वेळ घालवला, तो खूप चांगला होता. पण आता आम्ही वेगळे झालो आहोत. आमच्या नात्याचा प्रवास खूप चांगला होता आणि आता आम्ही आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जात आहोत. आपापल्या धर्माविषयी योग्य आदर मनात ठेवून आम्ही धार्मिक श्रद्धेखातर प्रेमाचा त्याग करत आहोत. आमच्या मनात एकमेकांविषयी अजिबात वितुष्ट नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा’, असं तिने लिहिलं होतं. मात्र या पोस्टनंतर हिमांशीला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हिमांशीला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर असिमनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली. ‘होय हे खरंय, आम्ही आमच्या धर्माविषयी असलेल्या श्रद्धेखातर प्रेमाचा त्याग केला आहे. आम्हा दोघांचं वय तीस वर्षांहून अधिक आहे आणि अशा पद्धतीचा निर्णय समजूतदारपणे घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. आम्ही परस्पर संमतीने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. हिमांशी आणि माझे मार्ग वेगवेगळे झाले आहेत आणि त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करतो. ब्रेकअपमागील खरं कारण काय आहे, हे मीच तिला लिहिण्यास सांगितलं होतं’, असं त्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

धार्मिक विविधतेमुळे ब्रेकअप केल्याचं हिमांशीने सांगितल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यानंतर तिने तिची पोस्ट डिलिट केली होती. गुरुवारी संध्याकाळी तिने असिमसोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला. असिमनेच मला खरं कारण लिहिण्यास सांगितलं होतं, असं तिने त्यातून स्पष्ट केलं होतं. ‘अजूनही मीच वाईट आहे का? कारण हा नीच माणूस आणि त्याचा चाहतावर्ग व्हिक्टिम आणि धार्मिक कार्ड खेळतोय. हे खरंच हास्यास्पद आहे’, असं लिहित तिने असिमचे चॅट उघड केले होते.

चॅटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

हिमांशी- तू म्हणालास म्हणून मी लिहिलं. असिम- तेच योग्य आहे. ब्रेकअपमागचं खरं कारण तू लिहायला पाहिजे होतं की आपण वेगवेगळ्या धर्माचे आहोत आणि आपल्या धार्मिक श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. एकमेकांच्या धर्माविषयी असलेल्या श्रद्धेमुळे आणि आदरामुळेच वेगळे होतोय, हे तू स्पष्ट करायला पाहिजे होतंस. हिमांशी- लिहिलं होतं, पण नंतर ते काढून टाकलं. कारण मग ते तुझ्यावर निशाणा साधतील. असिम- अजिबात नाही. एक टक्कासुद्धा नाही.

खरं कारण सांगूनही सतत ट्रोल होत असल्याने हिमांशी अखेर तिचा एक्स (ट्विटर) अकाऊंट डिलिट केला आहे. त्याआधी तिने शेवटची पोस्ट लिहिली आहे. ‘हे माझं शेवटचं उत्तर आहे की मी स्वत: धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. त्यामुळे मी कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही. मी फक्त माझ्या धर्माची निवड केली. ब्रेकअपसाठी तुमच्यापैकी कोणीही त्याला (असिम) दोषी ठरवू नये असं मला वाटत असेल तर तुमच्यापैकी कोणीही माझ्याविरोधातही टीका करू नये असं मला वाटतं. माझ्या भूतकाळातील रिलेशनशिपच्या वेळीही मी शांत होते. त्यामागे माझी काही कारणं होती. पण यावेळी मी संपूर्ण दोष स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा लोकांनी त्याचा अर्थ दुसराच काढला’, असं तिने लिहिलं आहे.

असिम रियाज हा प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता, रॅपर आणि फिटनेस स्पेशलिस्ट आहे. तर दुसरीकडे हिमांशी ही पंजाबी अभिनेत्री आणि गायिका आहे. बिग बॉस 13 मध्ये दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या शोमध्ये हिमांशीने वाईल्ड कार्ड एण्ट्री केली होती. ती बिग बॉसच्या घरात फार काळ टिकली नव्हती. पण त्या काळादरम्यान ती असिमच्या प्रेमात पडली.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.