AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतिफ असलमवर नोटांचा वर्षाव; भडकून गायक म्हणाला, “इतका श्रीमंत आहेस तर..”

प्रसिद्ध गायक आतिफ असलम याच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीने आतिफवर नोटांचा वर्षाव केला. त्यावर त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

आतिफ असलमवर नोटांचा वर्षाव; भडकून गायक म्हणाला, इतका श्रीमंत आहेस तर..
Atif AslamImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 27, 2023 | 12:19 PM
Share

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | गायक आतिफ असलम याला वेगळ्या परिचयाची गरज नाही. आपल्या सुरेल आवाजाने त्याने जगभरातील श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं. चित्रपटांमधील गाण्यांशिवाय आतिफ विविध राज्यांमध्ये आणि देशांमध्ये लाइव्ह कॉन्सर्टसुद्धा करतो. अशाच एका कॉन्सर्टचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टमध्ये आतिफसोबत असं काही घडलंय, जे पाहून तो मधेच थांबला आणि श्रोत्यांना खास विनंती केली. या व्हायरल व्हिडीओमध्ये आतिफ स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. ‘क्या से क्या हो गए देखते-देखते’ हे गाणं तो गात असतो आणि त्यावर श्रोतेसुद्धा मंत्रमुग्ध होतात. अशातच श्रोत्यांमधील एक व्यक्ती त्याच्यावर नोटांचा वर्षाव करू लागतो. आतिफला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. तो मध्येच गाणं थांबवतो.

गाणं थांबवल्यानंतर आतिफ बँडसुद्धा थांबवण्याचा इशारा करतो. त्यानंतर तो पैसे उडवणाऱ्या व्यक्तीकडे पाहून म्हणतो, “मित्रा, तू माझ्यावर या नोटा फेकण्याऐवजी एखाद्या गरजूला ते पैसे दान केलंस तर चांगलं होईल. मला माहितीये की तू फार श्रीमंत आहेस. मी तुझं कौतुक करतो. मात्र पैशांचा असा अनादर करू नकोस.” आतिफचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

आतिफ असलमचा चाहता आणि पाकिस्तानी गायक आगा अलीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘हे फक्त एक महान व्यक्तीच करू शकतो.’ इतरही नेटकऱ्यांनी आतिफच्या वागण्याचं कौतुक केलं आहे. ‘त्याने पैशांना हातसुद्धा लावला नाही, हे खूप चांगलं केलं’, असं एकाने म्हटलं. तर ‘आतिफने त्या व्यक्तीला खूप चांगल्याप्रकारे समजावलं’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

पहा व्हिडीओ

आतिफ असलम हा पाकिस्तानी गायक असून त्याने बॉलिवूडमधील बरीच हिट गाणी गायली आहेत. यामध्ये ‘दिल दिया गल्ला’, ‘देखते देखते’, ‘ओ मेरी लैला’, ‘पानियोंसा’, ‘तेरा होने लगा हूँ’, ‘दरअसल’, ‘बारिश’, ‘तेरे संग यारा’ या गाण्यांचा समावेश आहे. मात्र पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देणं बंद केल्यापासून आतिफने बॉलिवूडमधली गाणी गायली नाहीत.

आतिफच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास मार्च महिन्यात त्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. 23 मार्च रोजी आतिफची पत्नी साराने गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आतिफने चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली होती. आतिफ आणि सारा यांच्या मुलीचं नाव ‘हालिमा’ असं आहे. मूळ अरबी भाषेतल्या या नावाचा अर्थ संयमी आणि उदार असा होतो.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.