Atul Parchure | कर्करोगाच्या चुकीच्या उपचारांमुळे अतुल परचुरे यांची प्रकृती खालावली; अभिनेत्याचा मोठा खुलासा
अतुल परचुरे यांचा प्रकृतीबद्दल मोठा खुलासा... कॅन्सरच्या चुकीच्या उपचारांमुळे खालावली अभिनेत्याची प्रकृती
मुंबई | फक्त मराठीच नाही तर, हिंदी विश्वात देखील आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना पोट धरून हासवणारे अभिनेते अतुल परचुरे ‘माझा होशील ना’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. पण गेल्या अनेक दिवसांपासून ते फार कुठे दिसले नाहीत. यामागचं एक धक्कादायक कारण समोर येत आहे. अतुल परचुरे यांना कर्करोग झाल्यामुळे ते इतके दिवस समोर नव्हते. आता खुद्द अतुल परचुरे यांनी आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अतुल परचुरे यांनी एक किस्सा सांगितला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र अतुल परचुरे आणि त्यांच्या गंभीर आजाराची चर्चा रंगली आहे.
अतुल परचुरे म्हणाले, ‘माझ्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला येते होतो. पण काही दिवसांनंतर मला जाणवलं की काय खावसं वाटत नाहीये. त्यानंतर आठ दहा दिवस काही औषध घेतली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मला वाटलं प्रकृती अधिक खालावत आहे..’
पुढे अतुल परचुरे म्हणाले, ‘मी डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा डॉक्टरांनी अस्ट्रासोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तेव्हा डॉक्टरांच्या डोळ्यांमध्ये मला भीती दिसत होती. डॉक्टरांनी लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचं सांगितलं. मी डॉक्टरांना विचारं माझी प्रकृती स्थिर होईल ना? डॉक्टरांनी मला दिलासा देखील दिला आणि सगंळ ठिक होईल असा विश्वास दाखवला..’
‘पण उपचाराच्या सुरुवातीलाच काही वेगळं झालं. चुकीच्या उपचारांमुळे माझी प्रकृती आणखी बिघडली होती. चालताही येत नव्हतं. पुढे डॉक्टरांनी काही महिने थांबण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सांगितलं सर्जरी केली की तुम्हाला कावीळ होईल. जिवंत राहणार नाही… त्यामूळे ठरवलं दुसरा पर्याय योग्य आहे. डॉक्टरांचे आणखी दोन तीन सल्ले घेतले आणि आयुष्य बदलंलं..’ असं देखील अभिनेते म्हणाले.
यावेळी अतुल परचुरे यांनी ‘द कपिल शर्मा’ शोबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘गेल्या अनेक दिवसांपासून कपिल शर्मा शोपासून दूर आहे. मला सुमोना हिच्या वडिलांच्या भूमिकेसाठी बोलावलं होतं. पण कर्करोगाचं निदान झाल्यामुळे मला जाता आलं नाही. जर कर्करोग झाला नसता तर मी कपिल याच्यासोबत आंतरराष्ट्रीय ट्रीपवरर असतो. आता रिपोर्ट आल्यानंतरच कळेल की पूर्ण बरा झालो की नाही..’ असं देखील अतुल परचुरे म्हणाले.