Avatar 2: ‘अवतार 2’ची थक्क करणारी ॲडव्हान्स बुकिंग; पहिल्याच दिवशी मोडणार कमाईचे सर्व विक्रम?
'अवतार 2'ची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग; भारतात विकली गेली तब्बल इतकी तिकिटं
मुंबई: जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या चित्रपटानंतर जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ प्रदर्शित होतोय. अवतारने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यानंतर आता दुसऱ्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत. भारतात या चित्रपटाची पहिल्याच दिवसाची सर्व भाषांमधील कमाई ही 35 ते 40 कोटींच्या घरात होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
भारतात हा चित्रपट 3 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होतोय. या साय-फाय जॉनरच्या चित्रपटाचा बजेट निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केला नाही. मात्र तो तब्बल 350 दशलक्ष डॉलर्समध्ये बनवला गेल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वांत महागडा चित्रपट ठरतोय. भारतातही अवतारची बरीच क्रेझ पहायला मिळते.
‘अवतार 2’ची ॲडव्हान्स बुकिंग
दरदिवशी या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चांगलीच वाढ होतेय. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीसमध्ये तब्बल साडेचार लाख तिकिटं विकली गेली आहेत.
#Avatar *advance booking* status at *national chains* [#PVR, #INOX, #Cinepolis]… Till Wednesday, 11 am… ⭐️ F: 1,84,096 ⭐️ S: 1,38,577 ⭐️ S: 1,19,287 ⭐️ Total tickets sold: 4,41,960#AvatarTheWayOfWater pic.twitter.com/7WKIIyAamM
— taran adarsh (@taran_adarsh) December 14, 2022
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर लंडनमध्ये पार पडला. त्यानंतर हा चित्रपट माध्यमांना दाखवण्यात आला. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या प्रीमिअरनंतर सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या.
जेम्स कॅमरूनच्या कल्पनेतून उभारलेलं एक अनोखं विश्व आणि त्यातील व्हीएफएक्स पाहून प्रेक्षक थक्क झाले. जेम्सने पाण्याच्या आत एक वेगळं विश्व उभारलं आणि त्या अनोख्या विश्वाने प्रेक्षकांना भारावून टाकलं आहे.
अवतारचा पहिला भाग 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशाने सर्वांनाच थक्क केलं होतं. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 19 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. अवतार 2 हा त्याचा सीक्वेल आहे.