घरदार सोडलं, जमीन विकली, आईविरोधात जाऊन फिल्म इंडस्ट्रीत केलं काम; ‘बाहुबली’चा कटप्पा सध्या काय करतो?

'बाहुबली' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. यामध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज सध्या काय करतात हे माहितीये का? या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाने प्रेक्षकांना चांगलंच सतावलं होतं.

घरदार सोडलं, जमीन विकली, आईविरोधात जाऊन फिल्म इंडस्ट्रीत केलं काम; 'बाहुबली'चा कटप्पा सध्या काय करतो?
अभिनेते सत्यराजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 3:28 PM

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ हा चित्रपट अनेकांच्या चांगलाच लक्षात असेल. कारण या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट जरी दक्षिणात्य असला तरी हिंदीतही त्याचा प्रचंड बोलबाला पाहायला मिळाला होता. यामधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज. सत्यराज यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव रंगाराज सुबय्या असं आहे.

200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम

सत्यराज यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र राजामौलींच्या ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे त्यांना संपूर्ण देशभरात लोकप्रियता मिळाली. त्यांनी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज जरी ते इंडस्ट्रीत यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जात असले तरी एकेकाळी त्यांनी बराच संघर्ष केला आहे. अभिनयात करिअर करण्यासाठी त्यांनी घरसुद्धा सोडून दिलं होतं. इतकंच नव्हे तर आईच्या विरोधात जाऊन त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.

आईविरोधात जाऊन अभिनयक्षेत्रात काम

सत्यराज यांचं लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत काम करायचं स्वप्न होतं. मात्र त्यांच्या आईला फिल्म इंडस्ट्री पसंत नव्हती. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर होते आणि आई गृहिणी होती. सत्यराज यांना दोन लहान बहिणी आहेत. आईच्या विरोधानंतरही त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहणं बंद केलं नाही. त्यांनी घर सोडून आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. ‘कोडंबक्कम’ या पहिल्या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. 1976 मध्ये प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट होता.

हे सुद्धा वाचा

घर सोडलं, जमीन विकली

सत्यराज यांनी बॉटनी या विषयात बीएससीचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतरही त्यांना नोकरी मिळू शकली नव्हती. त्यांच्या हातात काम नव्हतं. तेव्हा त्यांना घराची जमीनसुद्धा विकावी लागली होती. अखेर एके दिवशी सत्यराज यांनी घर सोडून चेन्नई गाठलं. चेन्नईमध्ये ते काही वर्षांपर्यंत मिमिक्री करत होते. अखेर त्यांना एकेदिवशी कमल हासन यांचा चित्रपट मिळाला. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एनाक्कुल ओरुवन’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर सत्यराज यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्येही भूमिका साकारली होती. ‘बाहुबली’नंतर सत्यराज कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्यांचा ‘सुपर ह्यूमन वेपन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामधील त्यांच्या कामाचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.