बहिणीला खोलीत रात्रभर अशा अवस्थेत पाहिलं, करिश्माबद्दल करीना कपूरचा मोठा खुलासा

करिश्मा कपूर, करीना कपूर खान या बॉलिवूडच्या बहिणींना आज कोणत्याही ओळखीची गजर नाही.... पण एक काळ असा होता, जेव्हा प्रतिष्ठित कुटुंबातील असून देखील करिश्मा - करीना यांना करावा लागला अनेक अडचणींचा सामना... सध्या सर्वत्र करिश्मा - करीना यांची चर्चा...

बहिणीला खोलीत रात्रभर अशा अवस्थेत पाहिलं, करिश्माबद्दल करीना कपूरचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 9:16 AM

मुंबई | 6 मार्च 2024 : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर या दोन बहिणींना आज कोणत्याही ओळखीची गजर नाही. दोघींनी देखील बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एक दिवस असा होता जेव्हा करीनाने मोठी बहीण आणि आई बबीता कपूर यांना रात्रभर एकटं रडताना पाहिलं आहे. करीना कायम तिच्या खासगी आयुष्यात घडलेल्या घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते. एका मुलाखतीत करीना हिने बहीण करिश्मा हिच्याबद्दल मोठं सत्य सांगितलं होतं.

करीना आणि करिश्मा इंडस्ट्रीमधील सर्वात प्रेमळ बहिणींपैकी एक आहेत. दोघींमधील बॉन्ड सर्वांना माहिती आहे. दोघी बहिणी एकमेकींच्या चांगल्या वाईट काळात सोबत असतात. करिश्माच्या आयुष्यात जेव्हा वाईट काळ सुरु होता. तेव्हा करीनाने तिला जवळून पाहिलं आहे.

करिश्मा हिच्याबद्दल करीना म्हणाली, ‘मी करिश्माला तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून पाहात आहे. मी तिला बॉलिवूडमध्ये संघर्ष करताना पाहिलं आहे. मी करिश्माला रात्रभर आईसोबत एका खोलीत रडताना पाहिलं आहे. तिच्या मनात कायम एक भीती असायती, ती बॉलिवूडमध्ये यशस्वी होईल की नाही…’

‘मी लहान असल्यामुळे काही गोष्टी माझ्या समोर होत नव्हत्या. पण मी दोघींना वाईट परिस्थितींचा सामना करताना पाहिलं आहे.’ सांगायचं झालं तर, करिश्मा हिला बॉलिवूडमध्ये यश तर मिळालं, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रने अनेक अडचणींचा सामना केला आहे.

करिश्मा कपूर हिचं लग्न उद्योजक संजय कपूर याच्यासोबत झालं पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज करिश्मा तिच्या दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. करिश्मा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

करिश्मा लवकरच ‘मर्डर मुबारक’ (Murder Mubarak) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिची चर्चा रंगली आहे.

करीना आणि करिश्मा यांनी अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येतं. नुकताच करीनाच्या कुटुंबासोबत करिश्मा अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमासाठी जामनगर याठिकाणी पोहोचली होती. सोशल मीडियावर दोन्ही बहिणींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.