बादशाह काही तासांत झाला मालामाल, कमवले कोट्यवधी रुपये, जाणून व्हाल थक्क

Singer Badshah: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह काही तासांत झाला मालामाल, कमवले कोट्यवधी रुपये, आकडा जाणून व्हाल थक्क..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बादशाह याच्या कमाई आणि संपत्तीची चर्चा...

बादशाह काही तासांत झाला मालामाल, कमवले कोट्यवधी रुपये, जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 3:46 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील बादशाह एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आता देखील एका मोठ्या कारणामुळे बादशाह चर्चेत आला आहे. नुकताच, बादशाह याने एका कार्यक्रमात परफॉर्म केलं होतं. ज्यासाठी बादशाहला कोट्यवधी रुपये मानधन मिळालं आहे. बादशाह दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नाही तर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करत सर्वांचं मनोरंजन केलं. ज्यासाठी अंबानींनी बादशाहला कोट्यवधी रुपये मानधन दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत – राधिका यांच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म केल्यामुळे बादशाहला 4 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. सध्या सोशल मीडियावर बादशाहचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी देखील बादशाहसोबत डान्स करताना आणि गाणी बोलताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

बादशाह याची संपत्ती

रिपोर्टनुसार, बादशाह एका गाण्यासाठी 20 लाख रुपये मानधन घेतो. त्यामुळे मुकेश अंबानी, बादशाहला संगीत सोहळ्यात गाण्यासाठी किती मानधन देणार अद्याप समोर आलेलं नाही. बादशाह याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, रॅपरकडे 30 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, प्रत्येक वर्षी बादशाहच्या संपत्तीत 1 मिलियनने वाढ होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, हॉलिवूड गायक जस्टिन बिबर याने देखील संगीत सोहळ्यात परफॉर्म केलं. ज्यासाठी गायकाने तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न 12 जुलै रोजी मोठ्या थाटात होणार आहे. दुपारी 3 वाजता शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. एवढंच नाही तर, अंबाना कुटुंबियांनी रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं आहे. 14 जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे. ज्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात येणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.