Barkha Bisht | 15 वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट; दोन वर्षांपासून राहतायत वेगळे

बरखा आणि इंद्रनील यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया जरी आता सुरू झाली असली तरी जुलै 2021 पासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. लग्नाच्या 15 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे बरखा ही अभिनेता आशिष शर्माला डेट करत असल्याचीही चर्चा आहे.

Barkha Bisht | 15 वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट; दोन वर्षांपासून राहतायत वेगळे
बरखा बिश्त, इंद्रनील सेनगुप्ताImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 7:38 PM

मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकार बरखा बिश्त आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांवर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र अखेर बरखाने घटस्फोटाच्या वृत्तांना दुजोरा दिला आहे. आयुष्यातील हा सर्वांत कठीण निर्णय असल्याचं तिने म्हटलंय. बरखा आणि इंद्रनीलने 2008 मध्ये लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. मीरा असं त्या मुलीचं नाव आहे. “होय, आमच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण निर्णय आहे”, असं ती म्हणाली. मात्र यावेळी बरखाने त्यांच्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नाही.

घटस्फोटाबद्दल काय म्हणाली बरखा?

“मी सिंगल मदर आहे आणि मीरा ही माझी प्रायोरिटी आहे. मी सध्या ओटीटीवर चांगले प्रोजेक्ट्स करतेय. मी टेलिव्हिजन आणि चित्रपटातही काम करण्यास उत्सुक आहे”, असं बरखाने सांगितलं. एकेकाळी इंद्रनील आणि बरखा यांच्या प्रेमकहाणीची जोरदार चर्चा होती. या दोघांची तगडी फॅन फॉलोईंग आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Barkha (@barkhasengupta)

बरखा आणि इंद्रनील यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया जरी आता सुरू झाली असली तरी जुलै 2021 पासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. लग्नाच्या 15 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे बरखा ही अभिनेता आशिष शर्माला डेट करत असल्याचीही चर्चा आहे. आशिष शर्मा हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. सिया के राम, रंगरसिया, गुनाहों का देवता, इटर्नल लव्ह यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय.

कोण आहे इंद्रनील सेनगुप्ता?

इंद्रनीलने 2004 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘शुक्रिया’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. याशिवाय त्याने मुंबई साल्सा, 1920, ऑटोग्राफ, सत्याग्रह, मुल्क आणि कॅलेंडर गर्ल्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही भूमिका साकारल्या आहेत. द गॉन गेम, लव्ह अँड अफेअर्स, मिथ्या, फेम गेम, ब्लडी ब्रदर्स आणि द ब्रोकन न्यूज यांसारख्या सीरिजमध्येही तो झळकला आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.