टिक टॉक स्टार संतोष मुंडे याच्यासह एकाचा मृत्यू, कारण काय?

संतोष मुंडे हा फेमस टिक टॉक स्टार असून याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलंय.

टिक टॉक स्टार संतोष मुंडे याच्यासह एकाचा मृत्यू, कारण काय?
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 9:54 PM

मुंबई : टिक टॉक स्टार म्हणून अत्यंत कमी वेळेमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करणारा बीडमधील संतोष मुंडे याचा आज दुर्देवी मृत्यू झालाय. संतोषच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातंय. संतोषसोबतच बाबुराव मुंडे याचाही मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी (13 डिसेंबर 2022) रोजी संतोष आणि बाबुराव हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने यांचा जागीच मृत्यू झालायं.

संतोष मुंडे हा फेमस टिक टॉक स्टार असून याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलंय. बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ही घटना घडलीये. संतोष आणि बाबुराव यांचे जागीच निधन झाले.

हा अपघात नसून घातपात असल्याची एक चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. कारण अगदी कमी काळामध्ये संतोष याने टिक टॉकच्या माध्यमातून एक खास ओळख तयार केली आहे.

संतोष त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जायचा. संतोषचे लाखांवर फाॅलोवर्स आहेत. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायचा.

या घटनेची नोंद धारूर पोलिसांनी केलीये. संतोष याचे निधन झाले यावर अजून त्याच्या चाहत्यांना विश्वासच बसत नाहीये. संतोषच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी भोगलवाडीकडे धाव घेतली.

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.