गुलशन कुमार यांच्या पुतणीचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन; ‘या’ आजारामुळे गमावले प्राण

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची पुतणी टिशा कुमारचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून ती आजारी होती आणि जर्मनीत तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर जर्मनीच्या रुग्णालयातच तिची प्राणज्योत मालवली.

गुलशन कुमार यांच्या पुतणीचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन; 'या' आजारामुळे गमावले प्राण
कृष्ण कुमार, टिशा कुमारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 1:55 PM

अभिनेते आणि निर्माते कृष्ण कुमार यांची 21 वर्षीय मुलगी टिशा कुमारचं 18 जुलै रोजी निधन झालं. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर गुरुवारी तिची प्राणज्योत मालवली. कृष्ण कुमार हे ‘टी-सीरिज’चे गुलशन कुमार यांचे बंधू आणि भूषण कुमार यांचे काका आहेत. टिशावर जर्मनीत उपचार सुरू होते. जर्मनीतीलच रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. “टिशा 21 वर्षांची होती. तिला कर्करोगाचं निदान झालं होतं आणि उपचारासाठी कुटुंबीयांनी तिला जर्मनीला न्यायचं ठरवलं होतं. जर्मनीत उपचारादरम्यान तिचं निधन जालं. कुमार कुटुंबीयांसाठी ही अत्यंत दु:खाची वेळ आहे”, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘टी-सीरिज’कडूनही टिशाच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. ‘कृष्ण कुमार यांची मुलगी टिशा कुमार हिचं काल निधन झालं. ती कर्करोगाशी झुंज देत होती. कुटुंबीयांसाठी ही फार दु:खाची वेळ असून तुम्ही आमच्या खासगी आयुष्याचा आदर कराल अशी विनंती आहे’, असं निवेदन टी-सीरिजकडून देण्यात आलं आहे. दोन महिन्यांतच टिशाचा वाढदिवस येणार होता. मात्र त्यापूर्वीच तिची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.

कोण आहे टिशा कुमार?

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे छोटे बंधू कृष्ण कुमार आहेत. त्यांनी फक्त पाच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. मात्र 1995 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘बेवफा सनम’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील गाणीसुद्धा गाजली होती. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ हे गाणं याच चित्रपटातील होतं. टिशा ही कृष्ण कुमार आणि त्यांची पत्नी तान्या सिंह यांची मुलगी होती. तान्यासुद्धा गायिका आणि अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘आजा मेरी जान’ (1993) या चित्रपटातून कृष्ण कुमार यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 2000 च्या सुरुवातीला ‘वो बीते दिन’ हे त्यांचं गाणं खूप गाजलं होतं. त्यांचे वडील अजित सिंह हे संगीतकार आणि बहीण नताशा सिंह अभिनेत्री होती. कृष्ण कुमार हेसुद्धा टी-सीरिजचं काम पाहायचे. गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार हा टिशाचा चुलत भाऊ आहे.

हे सुद्धा वाचा

6 सप्टेंबर 2003 रोजी जन्मलेल्या टिशाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र टी-सीरिजच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगदरम्यान तिला अनेकदा पाहिलं गेलं. 30 नोव्हेंबर 2023 रोजी रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं होतं. तेव्हा टिशा तिच्या वडिलांसोबत पोहोचली होती. यावेळी तिने पापाराझींसमोर वडिलांसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले होते.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.